AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाराज प्रफुल पटेल शरद पवारांकडे मोठ्या आशेने गेले पण…, सिल्व्हर ओकवर नेमकं काय घडलं? पटेल पवार भेटीची इनसाईड स्टोरी

12 मे रोजी प्रफुल पटले यांनी शरद पवार यांची त्यांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली. यावेळी सुनील तटकरे देखील उपस्थित होते. त्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे.

नाराज प्रफुल पटेल शरद पवारांकडे मोठ्या आशेने गेले पण..., सिल्व्हर ओकवर नेमकं काय घडलं? पटेल पवार भेटीची इनसाईड स्टोरी
प्रफुल पटेल, शरद पवार भेट Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 17, 2026 | 4:29 PM
Share

राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सध्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पत्रावरून गोंधळाचं वातावरण पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडून निवडणूक आयोगाला राष्ट्रीय कार्यकारिणी संदर्भात एक पत्र देण्यात आलं होतं. या पत्रामध्ये राष्ट्रवादीचे बडे नेते असलेले प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांचं नाव होतं, मात्र त्यांच्या नावापुढे त्यांच्या पदाचा कोणताही उल्लेख नव्हता. प्रफुल पटेल हे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आहेत, तर सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. परंतु या दोन्ही नेत्यांच्या पदाचा या पत्रात उल्लेख नव्हता, या सर्व पार्श्वभूमीवर बारा मे रोजी या दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली, या भेटीमध्ये पक्षामध्ये कशापद्धतीने निर्णय घेतले जात आहेत आणि पक्ष कशापद्धतीने चालवला जात आहे?  याचा पाढा त्यांनी वाचला. मात्र शरद पवार यांनी या गोष्टीवर या दोन्ही नेत्यांशी बोलणं टाळलं आहे. इतर विषयांवरच गप्पा झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

भेटीमध्ये नेमकं काय घडलं? 

प्रफुल पटेलांनी शरद पवार यांच्यासमोर पार्थ पवारांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर प्रफुल पटेलांकडून शरद पवार यांच्यासमोर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. 12 मे रोजी पटेल, आणि सुनील तटकरे हे शरद पवार यांच्या भेटीला गेले होते, त्यावेळी नाराजी व्यक्ती केल्याची माहिती समोर येत आहे.

मागील अनेक दिवसांपासून प्रफुल पटेल शरद पवारांच्या भेटीसाठी प्रयत्न करत होते. 12 एप्रिल रोजी शरद पवारांनी पटेल यांना भेटीसाठी वेळ दिली. मात्र सुनील तटकरे सिल्व्हर ओकवर भेटीसाठी येणार याची कोणालाही कल्पना नव्हती.  तटकरे सिल्व्हर ओकवर येणार याची शरद पवार यांना देखील कल्पना नव्हती, अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. 12 मे रोजी रात्री आठ वाजता अचानक तटकरे सिल्व्ह ओकवर हजर झाले. तटकरेंच्या आधीच प्रफुल पटेल सिल्व्हर ओकवर पोहोचले होते.

सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि शरद पवार यांच्यात 15 ते 20 मिनिटं चर्चा झाली. या चर्चेत सुनील तटकरे काहीच बोलले नसल्याची माहिती समोर येत आहे.  प्रफुल पटेल आणि शरद पवार यांच्यामध्येच चर्चा झाली. या भेटीत पटेल यांनी शरद पवार यांच्यासमोर पार्थ पवार यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली.  पार्थ पवारांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आणि त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल पटेलांनी नाराजी व्यक्त केली, यावेळी पवारांनी पटेलांचं म्हणणं फक्त ऐकून घेतलं, त्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही अशी माहिती समोर येत आहे.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?