Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हम चलते तो चिता की रफ्तार से चलते… बच्चू कडू यांचा सूचक इशारा; सुस्साट बैलगाडीही हाकली

बच्चू कडू कधीच थांबत नाही. तो आता आणखीन ताकतीने पुढे जाणार आहे. आम्ही शेतकरी आणि शेतमजुरांसाठी लढतोय.. तर आमच्या रक्ताचा प्रत्येक थेंब या शेतकऱ्यांसाठी आहे असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले

हम चलते तो चिता की रफ्तार से चलते... बच्चू कडू यांचा सूचक इशारा; सुस्साट बैलगाडीही हाकली
Follow us
| Updated on: Jan 23, 2025 | 7:40 PM

अमरावतीच्या बहिरम यात्रेत बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाड्याच्य या शंकरपटात राज्यभरातील बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी देखील यात्रेत सहभाग घेतला होता.त्यांनी बैलगाडी चालवून अवघ्या 6.99 सेकंदात मारली बाजी मारली आहे. यावेळी त्यांनी मला पाडण्याची कुणाची औकात नाही.  तुम्ही बेईमानी केली म्हणून मी हरलो, हे मताचे चोर आहेत साले अशी टीका यावेळी बच्चू कडू केली आहे.

विदर्भातील सर्वात मोठी बहिरम यात्रा अमरावतीत भरली आहे. या यात्रेत बैलगाडाशर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेनिमित्त माजी मंत्री बच्चू कडू यांनी भव्य शंकरपटाचं आयोजन केल होते. या प्रसंगी आमदार बच्चू कडू यांनी स्वतः बैलजोडी घेऊन शंकरपटात सहभागी होऊन अगदी धूरकरी प्रमाणे अवघ्या 6.99 सेकंदात पल्ला गाठला.बच्चू कडू यांनी अतिशय सुसाट वेगाने धुरकरीपेक्षा वेगाने बैलजोडी हाकली. बच्चू कडू यांच्या बैलगाडीने अवघ्या काही सेकंदातच शर्यतीचा पल्ला गाठला. बच्चू कडू यांनी अवघ्या 6.99 सेकंदात बाजी मारलेली पाहून गावकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांच्या मुलाची छाती आहे

बच्चू कडू यांनी यावेळी गावकऱ्यासमोर छोटे खाणी भाषण केले, ही 56 इंचाची छाती नाही तर शेतकऱ्यांच्या मुलाची छाती आहे. बैल जोडी आवरत नव्हती इतकी सुसाट पळाली आहे. हम चलते तो चिता की रफ्तार से चलते… रोकने की तुम्हारी औकात नही थी. तुम्ही बेइमानी केली म्हणून मी हरलो, हे मताचे चोर आहे तर बच्चू कडू थांबत नाही आणखी ताकतीने आम्ही धावणार शेतकरी आणि शेतमजुरांसाठी आम्ही लढतोय.. तर आमच्या रक्ताचा प्रत्येक थेंब या शेतकऱ्यांसाठी आहे असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.