AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फॅन, सोलार पॅनल, चार्जिंग पॉईंट; गोंदियाच्या पठ्ठ्याने तयार केलं सुपर हेल्मेट; महाराष्ट्रभर चर्चा

प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील प्रज्वल टेम्भूरणे नावाच्या तरुणाने चक्क सुपर हेल्मेट तयार केला आहे. (gondia prajwal tembhurne super helmet)

फॅन, सोलार पॅनल, चार्जिंग पॉईंट; गोंदियाच्या पठ्ठ्याने तयार केलं सुपर हेल्मेट; महाराष्ट्रभर चर्चा
PRAJWAL SUPER HELMET
| Updated on: Apr 10, 2021 | 11:29 PM
Share

गोंदिया : वाहतुकीचे नियम न पाळणे, तसेच इतर अनेक कारणांमुळे रस्ते अपघातामध्ये दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे, रस्त्यावर प्रवास करताना हुल्लडबाजी करणे किंवा लक्ष विचलित होणे अशी वेगवेगळी कारणं यामागे आहेत. मात्र, प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील प्रज्वल टेम्भूरणे (Prajwal Tembhurne) नावाच्या तरुणाने चक्क सुपर हेल्मेट तयार केला आहे. फक्त आयटीआयपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या या तरुणाने याआधीसुद्धा अनेक आश्चर्यकारक उपकरणांची निर्मिती केली आहे. (Prajwal Tembhurne form Gondia made super helmet have mobile charging point led lights)

सुपर हेल्मेटमध्ये bluetooth ची सुविधा

प्रज्वलने दुचाकीस्वारांसाठी एक अनोखं हेल्मेट तयार केलं आहे. हे हेल्मेट सर्व सुविधांनी युक्त आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रज्वलने हा चमत्कार करुन दाखवला आहे. सुरक्षित आणि सर्व सोयीसुविधांनी युक्त असल्यामुळेच प्रज्वलने या हेल्मेटचे नाव सुपर हेल्मेट ठेवले आहे. बाईक चालविताना अनेकजण मोबाईलवर बोलतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते. हा धोका टाळता यावा म्हणून प्रज्वलने तयार केलेल्या हेल्मेटमध्ये चक्क bluetooth सुविधा दिलेली आहे. या bluetooth च्या माध्यमातून दुचाकी चालवताना सुपर हेल्मेट न काढतासुद्धा मोबाईलवर बोलता येऊ शकते.

हेल्मेटमध्ये चक्क फॅन

डोक्याला घाम येतो, खूप गरम होतं, गुदमरायला लागतं अशी अनेक कारणं देऊन अनकेजण हेल्मटे घालायचं टाळतात. मात्र, यावर प्रज्वलने एक नामी उपाय शोधला आहे. प्रज्वलने आपल्या सुपर हेल्मेटमध्ये चक्क फॅन बसवला आहे. त्यामुळे हे सुपर हेल्मेट डोक्यावर घातले तरीसुद्धा गर्मी होणार नाही, असा दावा प्रज्वलने केला आहे.

हेल्मेटमध्ये चार्जिंगची सुविधा, एलईटी लाईट्स

दुरचा प्रवास करताना आपला मोबाईल कधी-कधी डिस्चार्ज होतो. त्यालासुद्धा प्रज्वलने उपाय शोधला आहे. त्याने तयार केलेल्या हेल्मेटमध्ये मोबाईल चार्ज करण्याची सुविधा आहे. तसेच या सुपर हेल्मेटमध्ये सोलार प्लेट बसवण्यात आल्या असून सूर्यप्रकाशाच्या मदतीनेसुद्धा मोबाईल चार्ज करता येऊ शकतो. रात्री उशिरापर्यंत प्रवास करताना अडचण येऊ नये म्हणून या सुपर हेल्मेटमध्ये मागच्या बाजूला एलईडी लाईट्स देण्यात आले आहेत.

स्वखर्चाने सुपर हेल्मेट

प्रज्वलने हे हेल्मेट तयार करताना विशेष काळजी घेतलेली आहे. त्याने वरील सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या असल्या तरी त्याने हेल्मेटचे वजन वाढू दिलेले नाही. तसेच हे हेल्मेट तयार करण्यासाठी त्याने स्वत:च्या खिशातून पैसे खर्च केले आहेत.

देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्या हाताने सत्कार

जेमतेम आयटीआय पास झालेल्या प्रज्वलच्या कामगिरीची दखल राज्य पातळीवर घेण्यात आलेली आहे. मनात जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने मागील वर्षी पर्यावरणपूरक सोलार सायकल तयार केली होती. त्याच्या या अविष्कारामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यामान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याचे कौतुक केले होते. परिणय फुके यांनी प्रज्वलकडून अशाच तब्बल 5 सायकल अंबाझरी पार्कमध्ये फिरण्यासाठी तयार करुन घेतल्या होत्या.

इतर बातम्या :

Partnered : True 48MP Quad Cam, Samsung Galaxy F12 बाजारात, 12 एप्रिलपासून विक्री

Flipkart Mobile Bonanza Sale : Asus ROG Phone 3 वर तब्बल 8000 रुपयांचा डिस्काऊंट

Mobile Bonanza Sale : ‘या’ 10 स्मार्टफोन्सवर तब्बल 8000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट

(Prajwal Tembhurne form Gondia made super helmet have mobile charging point led lights)

Follow Us
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद.....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद......
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन...
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन....
मोठी बातमी! सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, मेदांता हॉस्पिटल
मोठी बातमी! सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, मेदांता हॉस्पिटल.