Praniti Shinde News : राजीनामा हे केवळ नाटक, पुन्हा सहा महिन्यांनी.. ; प्राणिती शिंदेंची सरकारवर खोचक टीका
Praniti Shinde On Dhananjay Munde Resignation : माजी सरपंच संतोष देहसमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मुंडे यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.
संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूरपद्धतीने करण्यात आली आहे. हा राजीनामा त्याचवेळी घेतला गेला पाहिजे होता. मात्र हे सरकार अतिशय निगरगट्ट आहे, अशी टीका कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, हा राजीनामा देणं सुद्धा एक प्रकारचं नाटक आहे. वैद्यकीय कारणामुळे राजीनामा दिल्याचं मुंडे म्हणत आहेत. म्हणजे अजूनही त्यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी घेत राजीनामा दिला असं म्हंटलेलं नाही. हे कृत्य कोणी करायला सांगितलं, तो माणूस कोणाचा आहे हे जगजाहीर आहे. त्यामुळे मुंडे यांचं नाव आरोपी म्हणून सुद्धा आलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांना कोणीही पाठीशी घालण्याची गरज नाही, असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या.

कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती

कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप

बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
