मुंबई : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील गुंठेवारीची प्रकरणे नियमित करण्याबाबत नगरविकास विभागाने निर्गमित केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील विविध विकासकामांचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आढावा घेतला. ही सर्व कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश शिंदे यांनी या दोन्ही मनपा आयुक्तांना दिले. (Minister Eknath Shinde reviews various development works in Pune and Pimpri-Chinchwad)