AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाळा सुरू करण्याचा निर्णय होईल तेव्हा होईल, तोपर्यंत सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणार : अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना ते म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लसीकरण गतीने करण्यावर शासनाचा भर आहे.

शाळा सुरू करण्याचा निर्णय होईल तेव्हा होईल, तोपर्यंत सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणार : अजित पवार
Ajit pawar
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Sep 03, 2021 | 5:09 PM
Share

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना ते म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लसीकरण गतीने करण्यावर शासनाचा भर आहे. सामाजिक दायित्वातून क्रांतीदेवी बजाज ट्रस्टने दिड लाख लस दिल्या, हे कौतुकास्पद आहे. स्वंयसेवी संस्थांचे अशा कार्यातील योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय जेव्हा होईल तेव्हापर्यंत सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन आहे. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात मोठे यश आले आहे. खासगी संस्थांमध्येही लसीकरणाचे प्रमाण वाढवा, असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले. (Teachers and staff will be vaccinated before starting schools)

अजित पवार म्हणाले, कोरोनावर संपूर्णपणे मात करण्यासाठी आपण सर्वजण गत दीड वर्षांपासून सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत असून ही चिंतेची बाब आहे. महानगरासह ग्रामीण भागात काळजी घेतली नाही तर तिसरी लाट येऊ शकते. ही संभाव्यता लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. मात्र, तिसरी लाट येऊ नये यासाठी नियमांचे पालन अत्यावश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क, स्वच्छता, सुरक्षित अंतर यांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात लसीकरण वाढीवर शासनाचा भर असून प्रत्येक महिन्याला लसीकरण वाढविण्यात येत असल्याचे पवार यांनी सांगितले. कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असला तरी गाफील राहून चालणार नाही. आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच दक्षता नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश अजित पवार यांनी आज दिले.

गणेश मंडळांना सूचक इशारा

येत्या 10 तारखेपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. नागरिकांनी साधेपणाने घरगुती गणेशोत्सव साजरा करण्यास हरकत नाही. मोठ्या गणपतींबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतीलच, असं सांगतानाच मोठ्या गणपती मंडपात पहिल्या दिवशी गर्दी वाढली तर दुसऱ्याच दिवशी कठोर निर्बंध लावू, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

संबंधित बातम्या:

महापालिकेच्या तरण तलावच्या खासगीकरणाचा घाट, नितेश राणे यांची चौकशीची मागणी; मुख्यमंत्र्यांना पत्रं

राज्यातील गटसचिवांना 20 महिन्यांनंतर पगार मिळणार?; रोहित पवारांची सहकार मंत्र्यासोबत सकारात्मक चर्चा

आमच्यासाठी तो कायम मॉन्टीच होता, मनसे नेत्याने जागवल्या सिद्धार्थसोबतच्या बालपणीच्या आठवणी

(Teachers and staff will be vaccinated before starting schools)

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...