AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुर्कीच्या सफरचंदावर पुण्यातील व्यापाऱ्यांचा बहिष्कार, तुर्कीने पाकला पाठिंबा दिल्यामुळे व्यापारी आक्रमक

Turkey apple boycott, India Pakistan tension, Turkish apple ban,Apple prices increase,Geopolitical impact on trade

तुर्कीच्या सफरचंदावर पुण्यातील व्यापाऱ्यांचा बहिष्कार, तुर्कीने पाकला पाठिंबा दिल्यामुळे व्यापारी आक्रमक
तुर्कीच्या सफरचंदावर व्यापाऱ्यांचा बहिष्कारImage Credit source: TV9
| Updated on: May 12, 2025 | 12:14 PM
Share

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पापांचा मृत्यू झाला, त्याचा बदला घेण्यासाठी बारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. मात्र त्यानतंर पाकने कुरापती करत भारतावरच उलटून हल्ला केला. त्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले आणि त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. भारत पाकमधील तणावाच्या परिस्थितीदरम्यान जगातील बहुतांश देशांनी दहशतवादाचा निषेध करत भारताला पाठिंबा दर्शवला. मात्र काही कुरापती देशानी दहशतवाद पोसणाऱ्या पाकचीच तळी उचलून धरली. तुर्की हा पण त्यापैकीच एक.

याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला भारतीय व्यापाऱ्यांनी धक्का दिला आहे. ‘बॅन तुर्की’ म्हणत व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंदांवj बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे तुर्की सफरचंद बाजारातून गायब झाली आहेत. परिणामी इराणमधून येणाऱ्या सफरचंदांचे दर वाढले आहेत. घाऊक बाजारात 10 किलो सफरचंदामागे 200 ते 300 रुपये, तर किरकोळ बाजारात प्रति किलो 20 ते 30 रुपये दराने वाढ झाली आहे.

तुर्कीच्या भूमिकेमुळे सफरचंदावर बहिष्कार, व्यापारी आक्रमक

तुर्कीने पाकला पाठिंबा दिल्यामुळे भारतातील व्यापारी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आता व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंदाऐवजी इराण, वॉशिंग्टन आणि न्यूझलँड सफरचंदाला पसंती दिली आहे. इराण, वॉशिंग्टन आणि न्यूझलँड सफरचंदाच्या भावात पेटीमागे 200 ते 300 रूपयांची वाढ झाली असल्याची माहिती मार्केट यार्डातील सफरचंदाचे आडतदार, श्री गुरुदेव दत्त फ्रूट एजन्सीचे सत्यजित झेंडे यांनी दिली. मार्केट यार्डात देशासह परदेशातून सफरचंदाची आवक होत असते. भारत-पाकिस्तान तणावामुळे परदेशातील सफरचंदाच्या व्यवहारा वरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

जगभरातून विविध देशांकडून भारताला पाठींबा मिळत असताना तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला. मात्र यामुळे भारतातील व्यापारी चांगलेच भडकले असून दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीबद्दल व्यापाऱ्यांनी बॅन तुर्की हा ट्रेंड चालवला आहे. त्याअंतर्गतच तुर्की सफरचंदांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यंदा उत्पादन कमी असले तरी यंदा भारत-पाकीस्तान युध्दजन्य परिस्थिीतीत तुर्कीने पाकिस्तानला पाठींबा दिला. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत तुर्कीकडून खरेदी बॅन केली असून व्यापाऱ्यांनी आपला देशा, आपलं राष्ट्र प्रथम ही भूमिका घेत,  देशासाठी तुर्कीकडून खरेदी करणे टाळले आहे.

जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.