AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune news : भयानक ! बाईकमध्ये CNG भरताना नोझल उडालं, कर्मचाऱ्याचा डोळाच गेला !

पुण्यातील तीन हत्ती चौकातील सीएनजी पंपावर भीषण अपघात झाला. सीएनजी नोजल उडून एका कामगाराच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली, त्याला एक डोळा गमावावा लागला. पंप मालकांवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने सीएनजी पंपांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Pune news : भयानक ! बाईकमध्ये CNG भरताना नोझल उडालं, कर्मचाऱ्याचा डोळाच गेला !
CNG भरताना अपघात, कर्मचाऱ्याचा डोळाच गेला
| Updated on: Dec 17, 2024 | 2:33 PM
Share

पुण्यात एक अतिशय भयानक आणि धक्कादायक घटना घडली आहे. पंपावर बाईकमध्ये CNG भरत असताना गॅसचं नोझल उडून मोठी दुर्घटना घडली. CNGचं नोझलं उडून तेथील कर्मचाऱ्याला लागल्याने त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याला एक डोळा कायमचा गमवावा लागल्याची अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील तीन हत्ती चौकातील एस.स्वेअर सीएनजी पंपावर ही दुर्घटना घडली असून त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.हर्षद गणेश गेहलोत असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव असून त्याने डावा डोळा गमावला आहे. याप्रकरणी पंप मालक धैर्यशील पानसरे व राहित हरकुर्ली यांच्याविरुद्ध सहकार नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा घडला अपघात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षद गणेश गेहलोत (रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी)हा एस स्वेअर सीएनजी पंपावर कार्यरत आहे. तो बाईक्स , गाड्यांमध्ये सीएनजी भरण्याचे काम करतो. रविवारी संध्याकाळी तो पंपावर ड्य़ुटीवर होता. समोर उभ्या असलेल्या एका बाईकमध्ये तो सीएनजी भरत होता. त्याने त्याचा पाईप बाईकवर ठेवला आणि बटन ऑन करण्यासाठी तो गेला. मात्र तेवढ्यात त्या गॅसचे नोझल अचानक सुटलं आणि ते जोरात येऊन हर्षदच्या डोळ्यावर आदळले. त्याचा आवाज इतका मोठा होता की आजूबाजूचे लोक घाबरले आणि सैरावैरा पळू लागले. तर नोझल डोळ्याला लागल्याने गंभीर जखमी झालेला हर्षद धाडकन खालीच कोसळला.

डोळ्याला मोठी दुखापत

त्याच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली, हर्षदला उपचारांसाठी तातडीने डॉक्टरांकडे नेलं. मात्र त्याच्या डोळ्याचं बरंच नुकसान झाल्याचं डॉक्टरांन सांगितलं. या घटनेप्रकरणी पंप मालक धैर्यशील पानसरे व राहित हरकुर्ली यांच्याविरुद्ध सहकार नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार संदीप चव्हाण यासंदर्भात तपास करत आहेत. या घटनेमुळे सीएनजी पंपांवरील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आ

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.