पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे मेट्रोची ट्रायल नुकतीच पार पडली. अजित पवारांच्या उपस्थितीत मेट्रोची ट्रायल पार पडल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोच्या कामाची पाहणी केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडनं एक महत्वाची मागणी केलीय. पुण्यातील मेट्रो स्थानकांना महापुरुषांची नावं द्या, अशी मागणी संभाजी ब्रिगेडकरून करण्यात आली आहे. त्याबाबत संभाजी ब्रिगेडनं एक पत्र महा मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांनाही दिलं आहे. या पत्रात 13 महापुरुषांची नावंही त्यांच्याकडून सुचवण्यात आली आहेत. (Sambhaji Brigade demands naming of metro stations in Pune after great men)