AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात भूमीगत मेट्रोत साचलं पाणी, 100 फुट खोल टनेलमध्ये घडलं असं काही की…धक्कादायक माहिती समोर!

पुण्यात एक अजब घटना घडली आहे. भूमीगत मेट्रोच्या छतातून चक्क पाणीगळती होत आहे. यामुळे मेट्रोचे तब्बल 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर आता भूमीगत मेट्रोच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

पुण्यात भूमीगत मेट्रोत साचलं पाणी, 100 फुट खोल टनेलमध्ये घडलं असं काही की...धक्कादायक माहिती समोर!
pune metroImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 25, 2026 | 9:08 PM
Share

Pune Metro : पुण्यातील स्वारगेट-पिंपरी येथे अजब प्रकार घडला आहे. येथील भूमिगत मेट्रो मार्गात पाणी जमा व्हायला लागले आहे. यामागचे कारणही तसेच अजब आहे. याच भागातील एका घरमालकाने घराच्या परिसरात बोअरवेल घेतल्याने मेट्रोच्या बोगद्यात पाणी पाझरत आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर आता या मालकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दुसरीकडे या घटनेमुळे मेट्रो प्रशासनाचे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

नेमकं काय घडलं?

या घटनेमुळे पुणे भूमिगत मेट्रोची सुरक्षा धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे. बोअरवेलमुळे मेट्रो मार्गिकेत पाणी गळतीला सुरुवात झाली आहे. धनंजय मोटे असे घराच्या परिसरात बोअरवेल घेणाऱ्या घरमालकाचे नाव आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी घरमालक तसेच ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घराखालून भूमिगत मेट्रो मार्गिका गेली असल्याची माहिती असताना शुक्रवार पेठेतील धनंजय मोटे नामक घरमालकाने बोरवेल घेतल्याने हा प्रकार घडला. बोअरवेलमुळे स्वारगेट पिंपरी भूमिगत मेट्रो मार्गिकेत पाणी गळती सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता परिसरात ही घटना घडली.

25 लाख रुपयांचे नुकसान

हा प्रकार समोर येताच मेट्रोतील अधिकाऱ्यांनी याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मिळालेल्या माहितीनुसार मेट्रो मार्गिकेचा हा बोगदा जमिनीपासून साधारण 80 ते 100 फूट खोल आहे. बोगद्यात सहा इंच भेग पडल्याने ही पाणीगळती होत आहे. त्यामुळे मेट्रोच्या सुरक्षेविषयी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेमध्ये मेट्रो प्रशासनाचे मात्र 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे आरोपी घरमालकाने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. आम्ही बोअरवेल घेताना मार्यादीत स्वरुपातच जमिनीत ड्रिलिंग केली. आम्हाला फक्त 24 फुटानंतर पाणी लागले. त्यामुळे आम्ही आणखी खोल ड्रिलिंग केली नाही. त्यामुळे बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या छताला कशी हानी झाली, याबाबत आम्हाला कल्पना नाही, असे या घरमालकाने सांगितले आहे. त्यामुळे आता या प्रकरणी भविष्यात काय होणार? मेट्रोच्या सुरक्षेला धोका निर्माण होणार का? प्रशासन याबाबत काय खबरदारी घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?