AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या तिघांनी भीमराव कांबळेला दगड मारले, पण त्याने… नसरापूर प्रकरणी मोठी अपडेट समोर

नसरापूर अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून, तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीचा खोटारडेपणा उघड झाला असून ३२ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

त्या तिघांनी भीमराव कांबळेला दगड मारले, पण त्याने... नसरापूर प्रकरणी मोठी अपडेट समोर
nasarapur
| Updated on: May 13, 2026 | 10:36 AM
Share

संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणी आतापर्यंत विविध धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यातच आता या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती अत्यंत महत्त्वाचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज लागले आहे. यातून आरोपी भीमराव कांबळे याचा क्रूर चेहरा आणि खोटारडेपणा उघड झाला आहे.

धाडसी मुलांनी मारले होते दगड

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेच्या वेळी परिसरात खेळणाऱ्या तीन लहान मुलांनी प्रसंगावधान दाखवत आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला होता. ६५ वर्षीय नराधम भीमराव कांबळे जेव्हा पीडित चिमुकलीला गोठ्यात घेऊन जात होता, तेव्हा या मुलांनी त्याला पाहिले. त्यांनी गोठ्याच्या पत्रावर दगड फेकून आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र नराधमाने मुलांच्या अंगावर विटा फेकल्या. तसेच त्यांच्यावर आरडाओरडा करून त्यांना तिथून हाकलून लावले. यातील १० आणि ११ वर्षांच्या दोन मुलांनी दिलेली साक्ष पोलिसांनी न्यायालयासमोर नोंदवली असून, त्यांनी आरोपीची ओळख पटवली आहे.

सीसीटीव्हीने उडवला आरोपीचा बनाव

तसेच गेल्या काही दिवसांपासून आरोपी तपासात पोलिसांना सहकार्य करत नसून उडवाउडवीची उत्तरे देत आहे. मात्र, पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी गुन्ह्याच्या एक तास आधीपासूनच घटनास्थळी घुटमळताना दिसत आहे. त्याच्या हातात शेवची पुडी असल्याचेही स्पष्ट झाले आहे, ज्याचा वापर त्याने पीडितेला आमिष दाखवण्यासाठीही केला.

दरम्यान आतापर्यंतच्या तपासात चिमुकलीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. या अहवालात चिमुकलीच्या शरीरावरील जखमा टणक आणि बोथट वस्तूने केल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. तसेच पुणे ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत ३२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे मुलांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत.

१४ मे पर्यंत पोलीस कोठडी

याच पार्श्वभूमीवर आरोपीची पोलीस कोठडी १४ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. या गुन्ह्यात त्याला अन्य कोणी मदत केली आहे का, याचा तपास पोलीस घेत आहेत. पुणे ग्रामीण पोलीस या प्रकरणाचे दोषारोपपत्र (Charge sheet) लवकरच दाखल करणार असून, चिमुकल्या मुलांची साक्ष या खटल्यात सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत