एकनाथ खडसेंची पत्रकार परिषद सुरू असताना साध्या वेषात पोलीस घुसले… नाथाभाऊ संतापले; पुढे काय घडणार?
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांनी पुणे पोलिसांवर आरोप केले. आज त्यांनी एक पत्रकार परिषद घेत काही प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काही पोलिसही आले होते.

एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांनी पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी प्रकरणात अटक केली. दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर आज कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यापूर्वीच खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी रेव्ह पार्टी प्रकरणात ते मोठे खुलासे करताना दिसले. मात्र, ज्यावेळी एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद सुरू होती, त्यावेळी या पत्रकार परिषदेमध्ये पुणे पोलिस दाखल झाले. सिव्हिल ड्रेसमध्ये पुणे पोलिसांची टीम पत्रकार परिषदेत आली, असे खडसेंनी म्हटले.
खडसेंची पत्रकार परिषद सुरू असताना पोलिस दाखल
एकनाथ खडसे यांनी पुणे पोलिसांचे काही फोटो आणि व्हिडीओ दाखवले. माझ्या खाजगी प्रॉपर्टीमध्ये पोलिसांची येण्याची गरज काय असे म्हणत त्यांनी सवाल केला. एकनाथ खडसे यांनी अगोदरच दावा केला आहे की, पुणे पोलिसांकडून माझ्या जावयावर पाळत ठेवली जात होती. पोलिसांनी काढलेले फोटो आणि व्हिडीओ मिडियापर्यंत लगेचच कसे पोहोचतात.
आठ ते दहा पोलिस पाळत ठेवत असल्याचा आरोप
खडसेंही म्हटले की, माझ्या स्वत:च्या घराबाहेर आठ ते दहा पोलिस पाळत ठेऊन होते आणि पत्रकार परिषदेमध्ये ते आत येऊन बसले. मला वाटते की, माझ्यावर पाळत ठेवण्याचे काय कारण? आणि हे घरामध्ये येऊन बसले आणि पोलिसांना पत्रकार परिषदेमध्ये येऊन बसण्याचा कोणी अधिकार दिला. एकंदरीतच या राज्यात काय सुरू आहे? मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि बोलण्याचा अधिकारही आहे. एकनाथ खडसे पुढे म्हणाले, सिव्हील ड्रेसमध्ये पोलीस आले होते. पोलिसांकडून सांगण्यात आले होते जगदाळे नावाच्या PSI कडुन 5 ते 6 पोलfसांना पाठवण्यात आले होते. जगदाळे नावाचे पीआय यांनी पाठवलेत, माझ्यावर पाळत ठेवली जात आहे.
माझं तोंड बंद करण्याचा का प्रयत्न होतोय
माझं तोंड बंद करण्याचा का प्रयत्न होतोय. माझ्या छातीवर दहा दहा पोलिस या ठिकाणी का आणली जात आहेत. कोणत्या कारणासाठी सरकार घाबरतंय? या प्रश्नांची मला उत्तरे दिली पाहिजेत, असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले. एकनाथ खडसे यांनी दाखवलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या घरासमोर काही पोलिस उपस्थित असल्याचे दिसत आहे. पुण्यातील खराडी भागात झालेल्या या रेव्ह पार्टीनंतर राज्यातील राजकारणत मोठा भूकंप आल्याचे म्हणावे लागेल.
