‘बिर्याणीच्या ऑर्डरची ती ऑडिओ क्लिप हे षडयंत्र’, पुण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याचा आरोप

ही ऑडिओ क्लिप व्हायरल होत असताना हा प्रकार गंभीर आहे. याची चौकशी करण्याचे आदेश आपण दिल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. त्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांयाने ऑडिओ क्लिप म्हणजे एक षडयंत्र असल्याचा आरोप टीव्ही 9 शी बोलताना केलाय.

'बिर्याणीच्या ऑर्डरची ती ऑडिओ क्लिप हे षडयंत्र', पुण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याचा आरोप
व्हायरल ऑडिओ क्लिप हे षडयंत्र असल्याचा महिला पोलीस अधिकाऱ्याचा आरोप
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 6:05 PM

पुणे : पुण्यातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे. या मॅडम मटण बिर्याणीची ऑर्डर आणायला आपल्या कर्मचाऱ्याला सांगत आहे. महत्वाची बाब म्हणजे त्यांना ही बिर्याणी फुकट हवी आहे. आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे देण्याची गरज काय? असंही त्या आपल्या कर्मचाऱ्यांना सांगताना या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल होत असताना हा प्रकार गंभीर आहे. याची चौकशी करण्याचे आदेश आपण दिल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. त्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांयाने ऑडिओ क्लिप म्हणजे एक षडयंत्र असल्याचा आरोप टीव्ही 9 शी बोलताना केलाय. (viral audio clip on order of mutton biryani is a conspiracy)

“अजून चौकशी झालेली नाही. माननीय गृहमंत्री साहेबांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. त्यात जे सत्य आहे त बाहेर येईल. तसंच मी स्वत:ही तक्रार दाखल करणार आहे. चौकशी होऊ द्या. त्यातून सगळं कळेल. पोलीस विभागाची गरिमा राहावी म्हणूनच मी इथे आल्यापासून प्रामाणिकपणे काम करत आहे. जे चुकीचे लोकं होते त्यांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला, सरळ करण्याचा प्रयत्न केला. जे चुकीचे प्रकार होत होते ते थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज माझ्या नावाने हे व्हायरल केलं गेलं आहे. माननीय गृहमंत्रीसाहेब बोलले आहेत आणि चौकशी योग्यरितीने झाली तर ते शक्य होईल.”

‘प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना त्रास दिला जातो’

“माझ्या कार्यालयात काही कर्मचारी होते. त्यांना काढण्यासाठी मी पाऊल टाकलं होतं. त्यांचे भरपूर हितसंबंध होते, या गोष्टीमुळे वातावरण खराब होत होतं. म्हणून मी त्यांना पोलीस स्टेशनला परत पाठवलं. हे लोकं दुखावलेले आहेत. काही सिनिअर्सचा त्यांना पाठिंबा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं केलं गेलेलं आहे. हा एकप्रकारे मला गुंतवण्याचा प्रकार आहे. बदलीच्या वेळेलाच अशी गोष्ट का केली गेली. मी गृहमंत्र्यांना याबाबत माहिती देणार आहे. पोलीस विभागात काय सुरु आहे हे सगळ्यांना माहिती आहे. इथे प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना त्रास दिला जातो. मात्र, येणाऱ्या काळात ही परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा आहे. अशावेळी माध्यमांनीही सर्व बाबी तपासून अशा बातम्या देणं गरजेचं आहे,” असं मत महिला पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केलंय.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याचं फोनवरील संभाषण चांगलंच व्हायरल होत आहे. पुण्यातील डीसीपी मॅडमला एसपी हॉटेलची बिर्याणी हवी आहे, तीही मोफत! डीसीपी मॅडमची ही फर्माईश आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय. डीसीपी मॅडमच्या या कारभाराला वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी थेट पोलीस महासंचालकांनाच पत्र लिहिलं आहे. दरम्यान, आम्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीत.

जवळपास 5 मिनिटाची ही ऑडिओ क्लिप आहे. त्यात डीसीपी मॅडम मटण बिर्याणी, प्रॉन्स आणि अजून एका नॉन व्हेज भाजीची ऑर्डर द्यायला आपल्या कर्मचाऱ्याला सांगत आहेत. त्यांना हे सगळं एका चांगल्या हॉटेलमधून हवं आहे. हे पदार्थ जास्त तेलकट, तिखटही नको आहेत. त्याचबरोबर त्याची चव चांगली असावी असाही त्यांचा हट्ट आहे. या डीसीपी मॅडम फक्त ऑर्डर देऊन थांबल्या नाहीत. तर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे? असा सवालही केलाय. तो कर्मचारी मात्र यापूर्वी आपण नेहमी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणल्याचं सांगतोय. अशावेळी मॅडम महोदय त्या कर्मचाऱ्याला सर्व खाद्यपदार्थ फुकट आणण्यासाठी बजावत असल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.

ऑडिओ क्लिप तुम्हीच ऐका

मॅडमच्या पतीला मटण बिर्याणी आवडते तर त्यांना चिकन बिर्याणी. फोनवर ऑर्डर देताना त्या हॉटेल चालकाने पैसे मागितल्यास हद्दीतील पोलीस निरीक्षकाकडे तक्रार करा, असंही त्या आपल्या कर्मचाऱ्याला सांगायला विसरत नाहीत. डीसीपी मॅडमच्या या कारभाराला वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं आहे. भ्रष्टाचार वाढवणाऱ्या या अधिकारी महिलेची खाबुगिरी रोखण्याची आणि चौकशी करण्याची मागणी आता केली जात आहे.

संपूर्ण ऑडिओ क्लिप

महिला डीसीपी-विश्रामबागच्या इथे नॉनव्हेज खूप चांगलं मिळतं असं ती म्हणत होती मला पोलीस कर्मचारी-हो… महिला डीसीपी-कुठे? पोलीस कर्मचारी-ते मॅडम…एसपी बिर्याणीची साजूक तुपातली बिर्याणी महिला डीसीपी-बरं..अजून तेवढंच आहे? पोलीस कर्मचारी-अजून एक मटण थाली म्हणून आहे कोल्हापूरची महिला डीसीपी-बरं..जास्त चांगली कुठे आहे? पोलीस कर्मचारी-साजूक तुपातली मॅडम…एसपी बिर्याणीची मॅडम..त्यांच्याकडे दोन दोन प्रकार आहेत..नल्ली निहारी म्हणून एक प्रकार आहे.. पोलीस कर्मचारी-ऑईली बिलकूल नाही..आणि साजूक तुपातली पण चांगली आहे मॅडम..कलर वगैरे नसतं त्यात..काही नाही महिला डीसीपी-बरं जी एक चांगली असेल ती पाठवून द्याल सोनावणेकडे..जर काय याचा इश्यू असेल तर पीआयला सांगून द्याल मॅडमनं सांगितलं म्हणून..मी बोलू पीआयला पोलीस कर्मचारी-नाही मॅडम करतो मी महिला डीसीपी-नाही पण..त्याच्या हद्दीतलं आहे तर पैसे कशाला द्यायचे आपण..आपल्या हद्दीमध्ये पण पैसे द्यायचे का आपण? पोलीस कर्मचारी-आपण यापूर्वी असं कधी केलं नव्हतं त्यांना..ठीक आहे मॅडम मी सांगतो..पीआयशी बोलतो आणि हे करून घेतो महिला डीसीपी-मग तुम्ही काय करायचे? पोलीस कर्मचारी– आपण कॅशच करायचो मॅडम महिला डीसीपी-पे करून? पोलीस कर्मचारी-हो मॅडम…पे करूनच महिला डीसीपी-तेवढं करेल तो..त्यादिवशी मला बोलत होता एक हॉटेल आहे म्हणून…तेवढं करेल तो..त्याच्यात काय एवढं? पोलीस कर्मचारी-येस मॅडम..मी सांगतो महिला डीसीपी-नाहीतर दुसरं कोणी असेल..किंवा मी सांगते पोलीस कर्मचारी-नाही मी बोलतो महिला डीसीपी-त्यादिवशी मला बोलला तो..आम्ही तिथे फिरत होतोना तर मला बोलला..पण आपल्या हद्दीत आहे तर त्यासाठी का पैसे पे करायचे..आपल्या हद्दीतल्या गोष्टीसाठी कोणी पैसे पे करतं का?..मला माहीत नाही..

संबंधित बातम्या :

पुण्यात DCP मॅडमला हवी हॉटेलची मटण बिर्याणी… ती सुद्धा फुकट! कर्मचाऱ्यांचं थेट महासंचालकांना पत्र, ऑडिओ क्लिप व्हायरल

एसपीची फुकट बिर्याणी महागात, पुण्यातील महिला डीसीपीच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश

viral audio clip on order of mutton biryani is a conspiracy

लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.