AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निलेश घायवळच्या घरावर छापेमारी, पोलिसांना काय सापडलं? यादी आली समोर

कोथरुड गोळीबारानंतर फरार झालेल्या कुख्यात गुंड निलेश घायवळविरोधात पुणे पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. घायवळच्या घरांवर छापेमारी करून आक्षेपार्ह वस्तू व महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.

निलेश घायवळच्या घरावर छापेमारी, पोलिसांना काय सापडलं? यादी आली समोर
nilesh ghaywal
| Updated on: Oct 06, 2025 | 9:04 AM
Share

Nilesh Ghaywal House raid : कोथरुडमधील गोळीबारानंतरच्या मकोका कारवाईनंतर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला कुख्यात गुंड निलेश घायवळ हा परदेशात पसार झाला आहे. यानंतर आता पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्याभोवती पुणे पोलिसांकडून कारवाईचा फास मोठ्या प्रमाणात आवळला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुणे पोलिसांकडून निलेश घायवळच्या पुण्यातील घरांवर मोठी छापेमारी केली जात आहे. यात अनेक आक्षेपार्ह वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

पुणे पोलिसांनी निलेश घायवळच्या कोथरूडमधील घरात केलेल्या छापेमारीदरम्यान त्यांना बंदुकीच्या गोळ्या आढळून आल्या आहेत. याशिवाय, पोलिसांच्या हाती घायवळच्या विविध मालमत्तांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे लागली आहेत. यामध्ये सातबारे, साठेखत आणि विविध जमिनींची कागदपत्रे यांचा समावेश आहे. याबरोबरच, मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पासंदर्भातील काही महत्त्वाच्या फाइल्सदेखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

अनधिकृत मालमत्ता जप्त

तसेच दुसरीकडे, पुणे पोलिसांनी निलेश घायवळच्या बेकायदा मालमत्तांवरही कठोर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. पोलिसांनी पुणे महानगरपालिकेला एक पत्र पाठवले आहे. यात निलेश घायवळच्या नावावरील अनधिकृत बांधकामे आणि मालमत्तांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. या पत्राच्या आधारावर पुणे महानगरपालिका आता सक्रिय झाली आहे. यानुसार निलेश घायवळच्या अनधिकृत मालमत्तांवर कारवाई करण्याची तयारी केली जात आहे. मनपाचे पथक लवकरच निलेश घायवळच्या अनधिकृत मालमत्ता आणि थकीत कर असलेल्या मालमत्ता सीझ (जप्त) करण्याच्या कारवाईला सुरुवात करणार आहे.

अत्यंत कठोर कारवाईचा बडगा

दरम्यान कोथरूड गोळीबार प्रकरण आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवून निलेश घायवळने विदेशात पलायन केल्याचे समोर आले आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी त्याचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच त्याची बँक खाती आणि बेकायदेशीर मालमत्ता गोठवण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व घडामोडींवरून, पुणे पोलिसांनी संघटित गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी निलेश घायवळविरोधात अत्यंत कठोर कारवाईचा बडगा उगारत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

पाहा व्हिडीओ 

हेही वाचा : Pune firing case : निलेश घायवळनं पासपोर्ट मिळवण्यासाठी केलं मोठं कांड, लंडनला कसा पळाला? पोलिसांचा मोठा खुलासा

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.