AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकण कड्यावर भयंकर घडलं! तलाठी अन् अल्पवयीन मुलीची आत्महत्या? 1200 फूट खोल दरीत…

Pune Suicide Case : मृत्यू कधी येईल आणि त्याचे कारण काय असेल हे सांगता येत नाही. काही मृत्यू तर इतके गूढ असतात की त्याचं कारण समजणं फारच कठीण होऊन बसतं. सध्या पुण्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका तलाठी आणि मुलीचा मृतदेह खोल दरीत आडला आहे. या दोघांनीही आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय. […]

कोकण कड्यावर भयंकर घडलं! तलाठी अन् अल्पवयीन मुलीची आत्महत्या? 1200 फूट खोल दरीत...
pune talathi death
| Updated on: Jun 24, 2025 | 5:10 PM
Share

Pune Suicide Case : मृत्यू कधी येईल आणि त्याचे कारण काय असेल हे सांगता येत नाही. काही मृत्यू तर इतके गूढ असतात की त्याचं कारण समजणं फारच कठीण होऊन बसतं. सध्या पुण्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका तलाठी आणि मुलीचा मृतदेह खोल दरीत आडला आहे. या दोघांनीही आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय. असं असलं तरी दोघांच्याही मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कोकण कड्याहून साधारण 1200 फूट खोल दरीत हे दोन्ही मृतदेह आढळले आहेत. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

नेमकी काय माहिती समोर आली?

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात एक तलाठी आणि एका मुलीचा मृतदेह दरीत आढळला आहे. या दोघांनीही आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. पुण्याच्या जुन्नरमध्ये हे दोन्ही मृतदेह आढलले आहेत. आंबे-हातवीज येथील कोकण कड्यावरून उडी मारून या दोघांनी स्वत:चं आयुष्य संपवलं असा प्राथमिक अंदाज बांधला जातोय.

त्यांच्या कथित आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत पुरुष हा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथं तलाठी म्हणून कार्यरत होता. रामचंद्र साहेबराव पारधी (वय 40) असं या मृत तलाठ्याचं नाव आहे. तर या तलाठ्यासोबत ज्या मुलीचा मृतदेह आढळला आहे ती जुन्नरमधीलच रहिवासी आहे.

तीन चार दिवस कोकण कड्यावरच उभी होती गाडी

संबंधित मुलगी ही अल्पवयीन असल्याचं बोललं जातंय. ती रामचंद्र यांची नात्यातील होती. हे दोघे गेल्या आठवड्याभरापासून गायब होते. अशातच रामचंद्र यांची गाडी तीन-चार दिवसांपासून जुन्नरमधील कोकण कड्यावर उभी असल्याचे तेथील ग्रामस्थांना दिसले. तसेच याच गाडीजवळ पायातील चपलांचा जोड आढळून आल्याने ग्रामस्थांचा संशय बळावला होता.

16 जणांच्या पथकाना घेतला शोध

त्यानंतर कोकण कड्याच्या खोल दरीत शोध घेण्यात आला. या शोधानंतर सुमारे बाराशे फुटावर मृतदेह दोन आढळले आहेत. याबाबत जुन्नर पोलिसांना कळविण्यात आले आहे. जुन्नर येथील शिवजन्मभूमी रेस्क्यू टीमच्या 16 जणांच्या पथकाने दोन्ही मृतदेह खोल दरीतून बाहेर काढले आहेत. यात मुलीचा मृतदेह बाराशे फुटांवर, तर रामचंद्र यांचा मृतदेह तेराशे पन्नास फुटांवर सापडला.

पोलीस तपास करत असतानाच..

दरम्यान, मुलीचं अपहरण झाले असल्याची तक्रार नातेवाईकांनी 15 जून रोजी जुन्नर पोलिसांकडे केली होती. त्या अनुषंगाने पोलीस तपास करत होते. एकीकडे पोलीस तपास करत असताना दुसरीकडे या दोघांचेही मृतदेह दरीत आढळले आहेत. या दोघांनी आत्महत्या केली असावी असा प्रथमदर्शनी अंदाज आहे. मात्र पोलीस सर्व बाबी पडताळण्याचे काम करत आहेत.

Follow Us
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये..
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये...
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक.
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत.
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद.
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा.
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त.
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम.
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला.
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे..
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे...
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका.