AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंना पुन्हा ते ‘सिंहासन’ नाही? मविआच्या बैठकीत मोठी मागणी, काय आहे नेमकं?

पुण्यातील वज्रमूठ सभेची जबाबदारी स्वतः अजित पवार यांच्याकडे आहे. आज शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात मविआ पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडत आहे.

उद्धव ठाकरेंना पुन्हा ते 'सिंहासन' नाही? मविआच्या बैठकीत मोठी मागणी, काय आहे नेमकं?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 08, 2023 | 1:37 PM
Share

योगेश बोरसे, पुणे : शिंदे-भाजप युती सरकार पायउतार करण्यासाठी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) कंबर कसली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Shivsena) एकजुटीने राज्यभरात सभा घेत आहेत. महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांना संभाजीनगरातून दणदणीत सुरुवात झाली. तर पुढची सभा पुण्यात होतेय. संभाजीनगरात उद्धव ठाकरे, अजित पवार, जयंत पाटील या नेत्यांची भाषणं गाजली. मात्र एका गोष्टीची जास्त चर्चा झाली. सभेतील व्यासपीठावर उद्धव ठाकरे यांना वेगळी खुर्ची देण्यात आली होती. इतर खुर्च्यांपेक्षा वेगळी आणि उंच खुर्ची होती. त्यामुळे महाविकास आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे असेल का? त्यांना विशेष खुर्ची देण्यात आली ती ‘सिंहासन’ होतं.., अशा चर्चा घडू लागल्या. या चर्चा टाळण्यासाठी पुण्यातील सभेत मोठी खबरदारी घेतली जाण्याची शक्यता आहे.

पुण्यात ती चूक टाळणार?

संभाजीनगरात उद्धव ठाकरेंना देण्यात आलेल्या खुर्चीवरून अजित पवारांना स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. उद्धव ठाकरे यांना पाठीचा त्रास असल्याने तशा प्रकारची खुर्ची देण्यात आली होती. वज्रमूठ सभेत असा कोणताही भेदभाव झालेली नाही, असं अजित पवार म्हणाले होते. मात्र पुण्यातील सभेत ही चूक टाळली जावी, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याचं समोर आलंय.

पुण्यात कधी सभा?

पुण्यात वज्रमूठ सभेचं आयोजन १४ मे रोजी करण्यात आलंय.या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवरुन विविध चर्चा सुरु झाल्यानंतर आता पुण्यातील सभेत स्टेजवर एकाच प्रकारच्या खुर्च्या ठेवाव्या, अशी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची बैठकीत मागणी असल्याचं समोर आलंय.

या सभेची जबाबदारी स्वतः अजित पवार यांच्याकडे आहे. आज शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात मविआ पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडत आहे.

‘सिंहासन नव्हे ती टेकण्याची सोय’

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवरून खोचक टीका केली. उद्धव ठाकरेंना देण्यात आलेली खुर्ची सिंहासन म्हटलं गेलं, मात्र ती त्यांना टेकण्यासाठीची सोय असल्याचं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं.

सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.