AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिपंरी चिंचवडमधील जम्बो कोविड सेंटरमध्ये पहिल्याच दिवशी डॉक्टर आणि रुग्णांना फुटला घाम!

जम्बो कोविड सेंटरमध्ये पहिल्याच दिवशी डॉक्टर आणि रुग्णांना घाम फुटल्याचं पाहायला मिळालं. कारण या जम्बो कोविड सेंटरमधील एअर कंडिशनची सुविधाच बंद पडली.

पिपंरी चिंचवडमधील जम्बो कोविड सेंटरमध्ये पहिल्याच दिवशी डॉक्टर आणि रुग्णांना फुटला घाम!
पिंपरी-चिंचवडमधील जम्बो कोविड सेंटरमधील एसीची सुविधा बंद, रुग्णांना घामाच्या धारा
| Updated on: Apr 01, 2021 | 7:22 PM
Share

पिंपरी चिंचवड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि दिवसेंदिवस वाढत चाललेली रुग्णांची संख्या यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येत असल्याचं चित्र सध्या राज्यात पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पिंपरी चिंचवडच्या नेहरुनगरमध्ये जम्बो कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली. पण या जम्बो कोविड सेंटरमध्ये पहिल्याच दिवशी डॉक्टर आणि रुग्णांना घाम फुटल्याचं पाहायला मिळालं. कारण या जम्बो कोविड सेंटरमधील एअर कंडिशनची सुविधाच बंद पडली. सध्या तापमानातही मोठी वाढ झाली आहे. अशावेळी कोविड सेंटरमधील एसीची सुविधा बंद पडल्यामुळे कोविड सेंटरमधील रुग्णांना घामाच्या धारा लागल्या.(AC facility at Jumbo Covid Center in Pimpri Chinchwad shut down)

AC विना रुग्णांचे हाल, कोविड सेंटर चालकांची तारांबळ

जम्बो कोविड रुग्णालयातील एसीची सुविधा पुर्ववत करण्यासाठी 72 तासांचा वेळ लागण्याची शक्यता आहे. अशावेळी रुग्णांना इथं थांबणं कठीण जात आहे. त्यामुळे दुसरीकडे हलवण्याची मागणी इथल्या कोरोना रुग्णांनी केली आहे. दरम्यान एसीची सुविधा बंद पडल्यामुळे जम्बो कोविड सेंटर चालवणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. जम्बो कोविड सेंटरमधील उपचार करण्याचं आणि एसीचं काम करण्याचे ठेके वेगवेगळ्या कंपन्यांना दिले गेले आहेत.

आण्णासाहेब मगर स्टेडियममधील जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरु

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं नेहरुनगर इथल्या आण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये हे जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरु करण्यात आलं. ऑक्सीजन, व्हेंटिलेटर, आयसीयू अशा 200 बेडची व्यवस्था इथे करण्यात आली आहे. शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने महापालिका रुग्णालये, कोविड केअर सेंटर पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. त्यामुळे नेहरूनगर इथल्या अण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये 816 बेडचे अद्ययावत असलेले जम्बो कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. 1 सप्टेंबर 2020 पासून हे जम्बो कोविड केअर सेंटर रुग्णांच्या सेवेसाठी सुरु झाले होते. मध्यंतरी कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने 1 जानेवारी पासून जम्बो सेंटर बंद करण्यात आलं होतं. आता ते पुन्हा सुरू करण्यात आलं आहे.

रुग्णांसह डॉक्टर, कर्मचाऱ्यांना घामाच्या धारा

राज्यासह पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि रुग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी 1 एप्रिलपासून जम्बो कोविड सेंटर सुरु होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार आज कोविड सेंटरची साफसफाई करुन रुग्णांसाठी ते उपलब्ध करुन देण्यात आलं. पण पहिल्याच दिवशी एसीची सुविधा बंद पडल्यामुळे रुग्ण, डॉक्टर आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना घामाच्या धारा लागल्या.

संबंधित बातम्या :

Pune corona : चौथ्या टप्प्यातील लसीकरण, महापौरांनाही लस, 15 लाख नागरिकांना लस देण्याचं टार्गेट

Pune Corona Update : पुणे देशात अव्वल, समूह संसर्गाच्या उंबरठ्यावर

AC facility at Jumbo Covid Center in Pimpri Chinchwad shut down

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.