“मुळशी तालुक्याची रग दाखवून देऊ, कंपन्यांत घुसून पाहणी करु…”, प्रवीण तरडे भडकले

आपण आपली तालुक्याची रग कुठंही दाखवतो ना? दहा ठिकाणी आपली रग माहिती आहे.... तर आता आपली रग आपल्या आई-बापांसाठी दाखवा, असं प्रवीण तरडे म्हणाले. (Actor Pravin tarde Visit Mulashi uravade chemical company svs aqua technologies fire)

"मुळशी तालुक्याची रग दाखवून देऊ, कंपन्यांत घुसून पाहणी करु...", प्रवीण तरडे भडकले
प्रवीण तरडे

पुणे : पुण्याच्या मुळशी येथील उरवडे औद्योगिक वसाहतीत (Mulashi Uravade Chemical Company) आगीची मोठी दुर्घटना घडली. उरवड्यातल्या क्लोरिफाईड कंपनीत लागलेल्या आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या कंपनीत ही आग लागली. मंगळवारी घटनास्थळी प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी यांनी भेट दिली. यावेळी तरडे चांगलेच संतापले होते. आपले भाऊ बहिण कुठे आणि कशा अवस्थेत काय करतात, याची पाहणी आणि चौकशी आपण केलीच पाहिजे. मुळशी तालुक्याची रग दाखवून देऊ, कंपन्यांत घुसून पाहणी करु, अशा शब्दात तरडे यांनी आपला संताप व्यक्त केला. (Actor Pravin tarde Visit Mulashi uravade chemical company svs aqua technologies fire)

प्रवीण तरडे मुळशीचे भूमीपूत्र

प्रवीण तरडे हे मूळचे मुळशीचेच… ते तिथले भूमीपूत्र… वयाच्या विसाव्या बावीसाव्या वर्षी त्यांनी काही वर्षे तेथील कंपन्यांत काम केलंय. त्यांना तेथील परिस्थितीची जाणीव आहे. हीच गोष्ट त्यांनी मंगळवारी बोलून दाखवली. मी इथल्याच शेजारच्याच कंपनीत जवळपास दोन ते तीन वर्ष काम केलंय. मला इथली परिस्थिती माहिती आहे. आपले आय-बाप, बहीण भाऊ असेच महिन्या-वर्षांनी जळणार, आणि आपण हाच तमाशा पाहत बसायचं का? असा सवाल त्यांनी विचारला.

आता कंपन्यांत घुसू…

मी इथल्या सगळ्या सरपंच आणि उपसरपंच यांना विनंती करतो की आता आपले भाऊ बहीण- आई बाप, आपले नातलग जिथं कुठे काम करत अशतील तिथे आपण जाऊ, त्यांना विनंती करु, की आमची जवळची माणसं कुठं काम करतात, हे आम्हाला पाहू द्या. त्यांनी नाही ऐकलं तर आपण कंपन्यांत घुसू… पण ते कुठल्या परिस्थितीत काम करतात, हे आपल्याला पहावंच लागेल…. नाहीतर वर्षानुवर्षे आणि महिन्यांनोमहिने असा तमाशा बघण्याची आपल्यावर वेळ येईल…

40 बाय 40 मध्ये 38 माणसं कशी काय काम करतात?

40 बाय 40 मध्ये 38 माणसं कशी काय काम करतात? म्हणजे 20 माणसं वाचली यात आनंद मानायचा की दुर्दैव…? 40 बाय 40च्या ठोकळ्यात 10-12 केमिकलच्या मशीन्स आहेत आणि 38 माणसं कामाला, हे कसं शक्य आहे, असे संताप आणणारे आणि चीड आणणारे सवाल प्रवीण तरडे यांनी विचारले.

आपली रग आपल्या आईबापांसाठी, भाऊ बहिणीसाठी दाखवा

इथं तक्रार कोणाचीचं नाही, आपल्या सगळ्यांवर आता एक जबाबदारी आहे. शासन आणि प्रशासनावर अवलंबून राहू नका. आपलं कुणीतरी कंपनीत काम करतंय ना? चला मग आपल्याला आतमध्ये कंपनीत जायचंय. आपण आपली तालुक्याची रग कुठंही दाखवतो ना? दहा ठिकाणी आपली रग माहिती आहे…. तर आता आपली रग आपल्या आई-बापांसाठी दाखवा, असं प्रवीण तरडे म्हणाले.

(Actor Pravin tarde Visit Mulashi uravade chemical company svs aqua technologies fire)

हे ही वाचा :

Pune Fire : पुण्यातील उरवडे औद्योगिक वसाहतीमध्ये रासायनिक कंपनीला आग, 15 महिलांसह 18 जणांचा मृत्यू

Pune Fire | पुण्यात केमिकल कंपनीला भीषण आग, 15 ते 20 जण अडकल्याची भीती

Pune Fire : सॅनिटायझर कंपनीत 15 महिलांसह 17 जणांचा जीव घेणारी आग नेमकी कशी लागली?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI