AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीरमसाठी भावनिक, तर देशासाठी ऐतिहासिक क्षण, अदर पुनावालांकडून संपूर्ण टीमचा फोटो शेअर

दुसऱ्या एका फोटोत स्वत: अदर पुनावाला हे कोरोना लस ठेवण्यात आलेल्या ट्रकमध्ये बसलेले आहेत. (Adar Poonawalla Share Photo With Serum Institute of India whole Team)

सीरमसाठी भावनिक, तर देशासाठी ऐतिहासिक क्षण, अदर पुनावालांकडून संपूर्ण टीमचा फोटो शेअर
| Updated on: Jan 13, 2021 | 12:02 AM
Share

पुणे : अवघ्या काही दिवसात राज्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. कोरोनाची लस तयार होत असणाऱ्या पुण्याच्या सीरम इनस्टिट्यूटमधून लसीच्या वाहतुकीला सुरुवात झाली आहे. कोरोना लस देशातील वेगवेगळ्या भागात पोहोचवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सीरम इनस्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी भावनिक क्षण अशा आशयाची ट्वीटरवर पोस्ट केली आहे. तर अदर पुनावाला यांची ही पोस्ट ऐतिहासिक क्षणांची साक्षीदार ठरत आहे. (Adar Poonawalla Share Photo With Serum Institute of India whole Team)

कोव्हिशिल्ड लसीची पहिली मालवाहतूक देशातील विविध ठिकाणी पाठवण्यात येत आहे. हा सीरम इनस्टिट्यूटच्या संपूर्ण टीमसाठी हा एक भावनिक क्षण आहे, अशी पोस्ट सीरम इनस्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी लिहिली आहे. विशेष म्हणजे या पोस्टसोबत अदर पुनावाला यांनी सीरम इनस्टिट्यूटच्या संपूर्ण टीमचा एक फोटो पोस्ट केला आहे. तसेच दुसऱ्या एका फोटोत स्वत: अदर पुनावाला हे कोरोना लस ठेवण्यात आलेल्या ट्रकमध्ये बसलेले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही उत्पादन खर्चावर कोरोना लस उपलब्ध करुन दिली असल्याचं सांगितले. देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्याचा उद्देश असल्याचंही अदर पुनावालांनी सांगितले.

2021चे वर्ष आपल्यापुढील आव्हानात्मक वर्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पहिले 10 कोटी डोस 200 रुपयांना देण्यात येणार आहेत. देशातील प्रत्येक व्यक्ती, गरीब, आरोग्य कर्मचाराी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांच्यापर्यंत लस पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचंही पुनावाला म्हणाले.

दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिकेमध्ये लसीचा पुरवठा करण्याचा प्रयत्न असल्याचंही पुनावालांनी सांगितलं. सीरम इनस्टिट्यूटमधून आज सकाली तीन ट्रकमधून कोविशील्ड लस पुणे विमानतळावर पोहोचली. तिथून कोविशील्ड लस देशभरात पोहोचवण्यात येत आहे.देशातील 13 ठिकाणांवर लस पोहोचवली जाणार आहे.

ठळक बातम्या, बेधडक विश्लेषण, पाहा 8 PM स्पेशल रिपोर्ट, टीव्ही 9 मराठीवर

सीरम इनस्टिट्यूटला केंद्र सरकारनं कोविशील्ड लसीचा पुरवठा करण्यासाठी ऑर्डर दिली आहे. सीरम इनस्टि्टयूटच्या अधिकाऱ्यांनी कोरोना लसीचा एक डोस 200 रुपयांना देण्याचं जाहीर केले होते. सुरुवातीला सीरमकडून 1 कोटी 10 लाख डोस पुरवठा करण्यात येणार आहे.

दरम्यान, ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाकडून कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी दोन संस्थांच्या लसीला मंजुरी देण्यात आली आहे. सीरमची कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला मंजुरी देण्यात आली आहे. (Adar Poonawalla Share Photo With Serum Institute of India whole Team)

संबंधित बातम्या : 

तुम्हाला लस किती रुपयात मिळणार? अदर पुनावालांनी 200 रुपयांचं गणित सांगितलं

कोरोना लसीच्या वाहतुकीसाठी पुण्यात खास ट्रक्स; उद्या पहाटे लसीची पहिली खेप होणार रवाना?

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...