काय डोंगर, काय झाडी फेम शहाजीबापू पाटील गौतमी पाटीलसाठी धावले, म्हणाले, त्या बिचाऱ्या गौतमीला…
शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ती गरिब बिचारी रातभर झोपली नसेल असे म्हटले आहे.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील सध्या चांगलीच चर्चेत आहे. पण यावेळी ती तिच्या नृत्यामुळे किंवा कार्यक्रमामुळे चर्चेत नसून तिच्या गाडीच्या अपघातामुळे चर्चेत आहे. गौतमीच्या गाडीचा पुण्यात अपघात झाला. तिच्या गाडीने रिक्षाला धडक दिली. या अपघातामध्ये रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून चालक गंभीर जखमी आहे. सध्या रिक्षा चालकावर उपचार सुरु आहेत. तसेत गौतमी पाटीलच्या ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील हे गौतमीच्या बाजूने उभे राहिले आहेत.
काय म्हणाले शहाजी बापू पाटील?
शहाजी बापू पाटील गौतमी पाटील प्रकरणावर प्रतिक्रिया देत म्हणाले की, त्या गाडीत सेलिब्रेटी होती म्हणून इतका भपका करायची गरज नाही. ड्रायव्हरला अटक झाली गुन्हा दाखल झाला आहे. गाडी जप्त झाली आहे. कोर्टातून नुकसान भरपाई मिळेल. हा मुद्दा एवढा मोठा करायची काय गरज? त्या बिचाऱ्या गौतमी पाटीलला कशाला ताप देताय. तिच्या ड्रायव्हरने अपघात केलाय तो विषय संपलाय. गाडीत ती होती म्हणतात कोण नव्हती म्हणतंय. पण ड्रायव्हर कडून अपघात झाला तर मालकाला आत टाकून दोघांनी भांडणे करायची का?
वाचा: गौतमी पाटीलची दर महिन्याची कमाई किती? आकडा वाचून फुटेल घाम
‘बिचारी रातभर झोपली नसेल‘
पुढे शहाजी बापू पाटील म्हणाले की, ‘ड्रायव्हर चुकला की कोण चुकलंय हे पोलिस पाहतील. गाडी मालकानी ड्रायव्हरच ठेवायचं बंद करावे. मालकांनी गाड्या चालवल्या पाहिजेत. आता गौतमीला सांगा तूच गाडी चालव. दहाच्या स्पिडने हळू हळू जा म्हणजे कार्यक्रमाला ती आज बुकिंग केले की ती चार दिवसांनी पोहोचेल. एवढा बारका मुद्दा एवढा मोठा करु नका. ती गरिब बिचारी रातभर झोपली नसेल.‘
नेमकं प्रकरण काय?
मंगळवारी, 30 सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गौतमी पाटीलच्या वाहनाचा पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ अपघात झाला. हा अपघात एका हॉटेल समोर झाला. हॉटेलच्या समोर एक रिक्षा उभी होती. या रिक्षेला गौतमी पाटीलच्या वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर रिक्षा तीन वेळा पटली झाली. गाडीतील लोक उतरले आजूबाजुला फार कोणी नसल्याचा अंदाज घेत तेथून निघून गेले. जखमी रिक्षाचालक बराच वेळ रस्त्यावर तसाच पडून होता. ज्या रात्री अपघात घडला त्या वेळचं CCTV फुटेज पोलिसांच्या हाथी लागलं असून त्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. आता गाडी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
