सकाळी 8.30 वाजता मंत्रालयात जातो, कोणताच मंत्री एवढं काम करत नाही; अजित पवारांची टोलेबाजी; चिमटे काढत घेतला आढावा

सकाळी 8.30 वाजता मंत्रालयात जातो, कोणताच मंत्री एवढं काम करत नाही; अजित पवारांची टोलेबाजी; चिमटे काढत घेतला आढावा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चाकणमध्ये षटकारबाजी
Image Credit source: tv9 Marathi

विमानतळ बारामतीला नाही नेलं. याविषयी त्यांनी सांगितले की, आपलं सारख म्हणायचं विमानतळ बारामतीला नेलं, विमानतळ बारामतीला नेलं असं म्हणत आहेत. विमानतळाचा सर्व्हे डिफेन्सकडून केला जातो. हवाई उड्डाण मंत्रालय हे करत असते.

महादेव कांबळे

|

May 13, 2022 | 10:29 PM

पुणेः राजकारणातील रोखठोक अशी प्रतिमा असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कार्यक्रमाला येण्यास उशीर झाला म्हणून दिलगिरी व्यक्त केली. यावेळी त्यांनी कार्यक्रमाला येण्यासाठी का उशीर झाला हे सांगत त्यांनी हवामान खराब असल्याने हेलिकॉप्टरने उड्डाण केलं नाही आणि रस्त्यावर वाहनांची गर्दी असल्यानेच आपल्याला कार्यक्रमाला येण्यास उशीर झाल्याचे सांगत त्यांनी चाकणमधील कार्यक्रमात (Chakan Meeting) दिलगिरी व्यक्त केली. यावेळी अजित पवार यांनी विमान, रस्ते आणि बुलेट ट्रेन याविषयही त्यांनी आपले मत व्यक्त केले.त्यांनी विमानतळ बारामतील (Baramati Airport) गेलं यावर त्यांनी अनेकांची फिरकी घेत बारामतीविषयी राजकारण्यातून आणि सर्वसामान्यातून काय चर्चा असते यावरही त्यांनी आपले मत व्यक्त केले.

सारख सारख बारामतीच्या नावाने नका ओरडू

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, आमदार दिलीप मोहिते यांचं आणि तुमच्या सर्वांचा एक गैरसमज झाला आहे. विमानतळ बारामतीला नाही नेलं. याविषयी त्यांनी सांगितले की, आपलं सारख म्हणायचं विमानतळ बारामतीला नेलं, विमानतळ बारामतीला नेलं असं म्हणत आहेत. विमानतळाचा सर्व्हे डिफेन्सकडून केला जातो. हवाई उड्डाण मंत्रालय हे करत असते. त्यानंतर विमानतळाची जागा निश्चित केली जाते. झालेलं विमानतळ चोवीस तास सुरू रहायला हवं, त्याअनुषंगाने जागा निश्चित केली जाते. मुंबईनंतर सर्वाधिक लोकसंख्येच्या दृष्टीने पुण्याकडे पाहिलं जातं, अशा ठिकाणी मोठमोठे उद्योगधंदे येतात. यासाठी उद्योगपती स्वतःचे विमान घेऊन येतात. त्यांना लागलीच परतावे लागते. त्यामुळं पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

मी सकाळी 8.30 ला मत्रांलयात असतो

मुंबईमधील विमानतळाचा भार कमी करण्यासाठी प्रयत्न राहणार आहे, त्यासाठी पनवेलमधील विमानतळ सुरू करणार आहे. पुण्यातील विमानतळ कुठं व्हावं याची पाहणी केंद्रीय हवाई मंत्रालय करत आहे. मुख्यमंत्री देखील यावर लक्ष देऊन आहेत. त्यमुळे सर्वांकडे माझी मागणी आहे की, आता या विमानतळाचे काम तातडीनं सुरू करावे. जास्तीची दिरंगाई आता टाळणे गरजेची आहे. यावेळी अजित पवारांनी हे ही सांगितले की, काही वेळी काही जण कारण नसताना गैरसमज निर्माण करून घेतात. माहिती घेत नाही, मला विचारा? लगेच उपोषणला बसतात, मी सकाळी 8.30 ला मत्रांलयात असतो, कोणताच मंत्री नसतो पण मी असतो, मला सवय आहे लवकर काम करायचे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

इथं एक विमानतळ होता होता नाकीनऊ

असे दोन-दोन विमानतळ देता येत नाहीत, त्यामुळे इथं एक विमानतळ होता होता नाकीनऊ आले आहेत. ते काय खेळण्यातील विमानतळ आहे का असा सवाल करुन त्यांनी कृपया गैरसमज करून नका घेऊ, असे सांगत मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेनचा सर्व्हे चालू आहे त्यामध्ये मुंबई, नवी मुंबई, पुण्यातील काही तालुके येत आहेत, त्यामध्ये थोडं खेडं, मावळ, पुरंदर, बारामती, इंदापूर, पंधपूर, सोलापूर अन् तिथून हैदराबाद त्यात खूप कमी स्टेशन असणार आहेत. यामध्ये दळणवळणाची सोया व्हावी म्हणून आमचा प्रयत्न असणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें