AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात छत्र्या उगवल्यासारखं सगळे…; अजितदादांची पवार कुटुंबियांवर जळजळीत शब्दात टीका

Ajit Pawar on Sharad Pawar Family and Loksabha Election 2024 : अजित पवार सध्या इंदापूर तालुक्याचा दौरा करत आहेत. यावेळी ते स्थानिकांशी संवाद साधत आहेत. यावेळी अजित पवार यांनी पवार कुटुंबियांवर जोरदार टीका केली आहे. अजित पवार नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

पावसाळ्यात छत्र्या उगवल्यासारखं सगळे...; अजितदादांची पवार कुटुंबियांवर जळजळीत शब्दात टीका
| Updated on: May 02, 2024 | 6:20 PM
Share

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत आहे. पहिल्यांदाच पवार कुटुंबातील दोन व्यक्ती एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढत आहेत. त्यामुळे अवघ्या देशाचं लक्ष या निवडणुकीकडे आहे. अशातच पवार कुटुंबातील लोकही निवडणुकीचा प्रचार करताना दिसत आहेत. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. नणंद विरूद्ध भावजय या लढतीत अख्खं पवार कुटुंब उतरल्याचं अजित पवार म्हणालेत. पण निवडणुकी झाल्यावर हे लोक नसतील, असं सांगायलाही अजित पवार विसरले नाहीत.

अजित पवार यांची पवार कुटुंबांवर जोरदार टीका

कोण अॅग्रो-फिग्रो दम देत असेल तर त्यांना घाबरू नका. आपला दम लई भारी आहे. मी ऊस घेऊन जाईन तुमचा… अफवांवर विश्वास ठेवू नका. कार्यकर्त्यांना दम देऊ नका. उद्या निवडणूक झाली की इथं मीच आहे. हे सगळं कुणी येणार नाही. सगळे परदेशात जातील. इथं सगळी गर्मी आहे म्हणतील आणि परदेशात जातील. आता सगळे उगवले आहेत. पावसाळ्यात छत्र्या उगवल्यासारखं सगळे घरचे आले आहेत. एका एकेकाला… चार दिवस सासूचे अन् चार दिवस सुनेचे असतात. आमच्या घरात तर सुनेलाच परक मानलं जातं. सासऱ्याचे दिवस राहत नाहीत. कधीतरी सुनेचे दिवस येतील, असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवारांसह पवार कुटुंबियांवर टीका केली आहे.

अजित पवारांचा रोख कुणाकडे?

कुणीच काही करू शकत नाही. मी एक तर कुणाच्या नादी लागत नाही आणि कुणी नादी लागलं तर मी कुणाला सोडत नाही. कुणीच माझ्या नादी लागू नका. मी खपवून घेणार नाही. माझ्या लोकांना दमदाटी करू नका मस्ती दाखवू नका मस्ती मला जिरवता येते. मी कुणाला म्हणत आहे समझनेवाले को इशारा काफी है, असंही अजित पवार म्हणाले.

शरद पवारसाहेबांनी 71 हजार कोटी रुपयांचं देशाचं कर्ज माफ केलं. देवेंद्र फडणवीस राज्यात झाले आणि त्यांनी एकट्या राज्यात 35 हजार कोटींचे कर्ज माफी दिली. आम्ही आता हर्षवर्धन पाटील आणि मी एकमेकांच्या विरोधात लढून थकलो. पण विकास त्याचा प्रश्न यातून सुटू शकत नाही. आपल्याला तर विकास करावा लागेल म्हणून एकत्र आलो आहे. आम्ही आता सगळ्याना सहकार्य करू. सागळ्यांनी एकत्र येत काम करा. मला बारामतीमधून 1 लाख 68 हजारांच लीड मिळालं. विरोधकांच डिपॉजित जप्त होतं. म्हणून मला तिेथ काम करावं लागतं, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.