Ajit Pawar : निशाणा मला जमलाय ना… हातात रायफल घेतली, म्हणाले, काय?; अजितदादांचा निशाणा कुणावर?

Ajit Pawar : त्यानंतर दादा फुटबॉल मैदानावर गेले. सगळ्या मैदानाची माहिती घेतली. विद्यापीठाच्या क्रिकेट स्टेडियमवर रणजी सामने खेळवता येईल का? अशी विचारणाही त्यांनी केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी दादांना फुटबॉल खेळण्याची विनंती केली.

Ajit Pawar : निशाणा मला जमलाय ना... हातात रायफल घेतली, म्हणाले, काय?; अजितदादांचा निशाणा कुणावर?
निशाणा मला जमलाय ना... हातात रायफल घेतली, म्हणाले, काय?; अजितदादांचा निशाणा कुणावर?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 5:11 PM

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार(ajit pawar) जिथे जातात तिथे काही ना काही बातमी मिळतेच. कधी अजितदादा अधिकाऱ्यांची उलट तपासणी घेतात, कधी कार्यकर्त्यांची शाळा घेतात, कधी सूचना देतात, कधी ओरडतात तर कधी राजकीय (politics) टोलेबाजी करतात. त्यामुळे अजितदादा जे काही करतात त्याची आपसूकच बातमी होते. आज अजितदादा पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात आले होते. जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने अजित पवार हे विद्यापीठात आले होते. यावेळी ते शुटिंग रेंजमध्ये गेले. हातात रायफल (rifle shooting) घेतली. अन् प्रशिक्षकाकडे नजर रोखून म्हणाले, काय? तेव्हा प्रशिक्षक म्हणाले, दादा, रायफल हातात घ्या. त्यानंतर दादांनी रायफल व्यवस्थित हातात घेतली. प्रशिक्षक म्हणाले परफेक्ट. त्यानंतर दादा म्हणाले, काहीही बोलतो. नंतर दादांनी रायफलने नेम धरला, दादांनी सराईतपणे रायफलने नेम धरल्याचं पाहून सर्वच अवाक् झाले. त्यानंतर दादांनी शुटींग रेंज रायफल नेमकी कशी काम करते याची माहिती घेतली. ऑलम्पिकसाठी एवढंच मैदान असतं का? अशी विचारणाही त्यांनी केली.

अजित पवार यांनी यावेळी विद्यापीठ परिसरात झाडही लावलं. झाड लावताना त्यांनी हे कोणतं झाड आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी कर्मचारी म्हणाला लिंबाच झाडं. तेव्हा दादा म्हणाले, अरे कोणत्या विभागातून आणलंय? त्यानंतर त्यांनी झाड लावलं.

हे सुद्धा वाचा

दादांची किक

त्यानंतर दादा फुटबॉल मैदानावर गेले. सगळ्या मैदानाची माहिती घेतली. विद्यापीठाच्या क्रिकेट स्टेडियमवर रणजी सामने खेळवता येईल का? अशी विचारणाही त्यांनी केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी दादांना फुटबॉल खेळण्याची विनंती केली. तेव्हा दादा म्हणाले, मी नाही, उदय. मी चप्पल घातलीये. पण लोकांच्या आग्रहास्तव दादांनी शेवटी फुटबॉलला किक मारलीच. दादांनी किक मारलेला फुटबॉल कँमेरामनला जाऊन धडकला. त्यावर दादा लगेच म्हणाले, मी म्हणालो होतो ना लागल. त्यानंतर दादांनी हात जोडले आणि तिथून निघाले.

दादा म्हणाले, देऊ का कानाखाली

नंतर दादा जिमच्या विभागात गेले तेव्हा जाताना दादानी विचारलं याचं नियोजन कसं केलंय. किती लोक एकावेळी बसू शकतात? त्यावर कर्मचारी म्हणाला, 16 लोक बसतील. त्यावर दादांनी थेट सगळं सामानचं मोजलं. तर आकडा 10 होता. तेव्हा कर्मचारी 12 म्हणाले. दादा म्हणाले, दहाच की. त्यावर कर्मचारी म्हणाला, सर, 16 वस्तू आहेत. त्यावर दादा प्रमाने म्हणाले, देऊ का कानाखाली.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.