AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप ताणला जातोय? अजित पवार म्हणतात, उद्या कोतवाल, पोलीस पाटीलही पुढे येतील

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात आतापर्यंत विलीनीकरणाची मागणी नव्हती. आता ही मागणी आली आहे. तुमचं विलीनीकरण केलं तर उद्या कोतवाल आणि पोलीस पाटीलही पुढे येतील, असं सांगतानाच तुटेपर्यंत ताणू नका, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप ताणला जातोय? अजित पवार म्हणतात, उद्या कोतवाल, पोलीस पाटीलही पुढे येतील
deputy chief minister ajit pawar
| Edited By: | Updated on: Nov 27, 2021 | 2:36 PM
Share

पुणे: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात आतापर्यंत विलीनीकरणाची मागणी नव्हती. आता ही मागणी आली आहे. तुमचं विलीनीकरण केलं तर उद्या कोतवाल आणि पोलीस पाटीलही पुढे येतील, असं सांगतानाच तुटेपर्यंत ताणू नका, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. विलीनीकरणाचं प्रकरण उच्च न्यायालयात आहे. हायकोर्टाने समिती स्थापन केली आहे. त्यामुळे थोडं थांबलं पाहिजे. एसटीच्या संपात पगारवाढीची मागणी होती. आतापर्यंत विलीनीकरणाची मागणी नव्हती. आता मात्र ही मागणी पुढे आली आहे. उद्या एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण केलं तर उद्या पोलीस पाटील आणि कोतवालही पुढे येतील, असं पवार म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांनो आता थांबा

एसटी कर्मचाऱ्यांनी आता थांबलं पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. तुटेपर्यंत ताणू नये. एसटी कर्मचाऱ्यांचा जसा विषय आहे. तसा प्रवाशांचाही विचार करावा लागेल, असंही त्यांनी सांगितलं.

विमानतळावर कोरोना प्रमाणपत्रांची तपासणी नाही

यावेळी त्यांनी कोरोनाच्या नव्या व्हायरसबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. परराज्यातून विमानाने येणाऱ्या प्रवाश्यांची यापुढे विमातळावर पुन्हा कोरोनाबाबतच्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार नाही. हवाई प्रवास करणारे सर्व प्रवासी हे प्रवास सुरु कारण्यापूर्वीच कोरोनाच्या सर्व तपासण्या तसेच लसीकरणाची माहिती देऊनच प्रवासाला सुरुवात करतात. त्यामुळं ते प्रवासी पुण्यात पोहचल्यानंतर त्याचा कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी दोन- अडीच तास रांगेत थांबण्याची गरज नाही. त्यामुळे यापुढे बाहेरून पुण्यात येणाऱ्या प्रवाश्यांची तपासणी केली जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांच्या बाबतीत केंद्र सरकारने घालून दिलेलया नियमावलीचे पालन केले जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

म्हणून निवडणुका बिनविरोध झाल्या

विधान परिषदेच्या निवडणुकीवरून त्यांनी महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली. मुंबईत दोनच उमेदवार निवडून येणार होते. मात्र तिसरा उमेदवार आला आणि नंतर त्याने माघार घेतली. कोल्हापुरात कितीही गप्पा मारल्या, कितीही आवाज काढले तरी सतेज पाटीलच निवडून येणार होते. राष्ट्रवादीचे सर्वाधिक मते होती. काँग्रेसची त्याखालोखाल मते होती. तर धुळे-नंदूरबारमध्ये अमरीश पटेल कुठेही गेले तरी ते विजयी होतात. ते भाजपमध्ये गेले. त्यांच्याकडे संख्याबळ अधिक होते. त्यामुळे त्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली. अशा 6 पैकी 4 जागा बिनविरोध झाल्या. नागपूरमध्ये परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे तिथे निवडणूक होत आहे. वाशिममध्ये निवडणूक आहेत. शिवसेनेचे उमेदवार बजोरीया मागे निवडून आले आहेत. तिथेही निवडणूक होत आहे. सहा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार कुठेही नव्हता. ज्याच्या जागा त्याला द्यायच्या हे ठरलं होतं. म्हणून एका ठिकाणी भाजप आणि एका ठिकाणी काँग्रेसने माघार घेतली. आता भाजप, शिवसेना, काँग्रेसचा उमेदवार होता. त्यांच्यात एकवाक्यता नसल्याने निवडणूक लागलेली दिसते, असं ते म्हणाले.

दरम्यान, 2024 ला काँग्रेस महाराष्ट्रात आणि देशात मोठा पक्ष होणार आहे असं पटोले म्हणाले होते. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पटोलेंना आमच्या शुभेच्छा आहेत, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

तावडेंचं प्रमोशन, बावनकुळेंना बळ, गडकरींचे हात मजबूत; फडणवीसांचं काय चुकलं?

नव्या कोरोना विषाणूनं जगाला पुन्हा धडकी, नेमका किती घातक आहे ओमीक्रॉन?

Omicron Variant: आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय भारत पुढे ढकलणार? पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक

ज्यांच्या बुद्धीला जे वाटलं ते बोलले, अजित पवारांचा नारायण राणेंना टोला

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.