‘त्याच्या डोक्यात काही लोकांनी हवा घातलीय की…’, अजित पवार यांचं निलेश लंके यांच्याबाबत स्पष्ट वक्तव्य

"तो कालच माझ्याकडे आला होता. मी त्याला नीट समजावून काही गोष्टी सांगितल्या आहेत. पण त्याच्या डोक्यात काही लोकांनी एक हवा घातली आहे की, तू खासदार होशील. वास्तविक तसं नाहीय", अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

'त्याच्या डोक्यात काही लोकांनी हवा घातलीय की...', अजित पवार यांचं निलेश लंके यांच्याबाबत स्पष्ट वक्तव्य
Follow us
| Updated on: Mar 14, 2024 | 5:08 PM

पुणे | 14 मार्च 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके आज पुण्यात दाखल झाले आहेत. ते पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाच्या कार्यालायत पोहोचले आहेत. त्यांचं शरद पवार यांच्यासोबत बोलणं सुरु आहे. त्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीनंतर त्यांचा शरद पवार गटात पक्षप्रवेश होण्याची दाट शक्यता आहे. निलेश लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश केला तर अजित पवार गटासाठी मोठा धक्का असेल. निलेश लंके खासदारकीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांना अहमदनगर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवायची आहे. महाविकास आघाडीतून आपल्याल संधी मिळावी, असं कदाचित त्यांच्या मनात असल्याची चर्चा आहे. अर्थात याबाबत लवकरच स्पष्ट होईल. पण निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशाआधीच अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

निलेश लंके जाऊ शकत नाही. तसं झालं तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल. राजीनामा देवून कुठेही जाता येतं. वास्तविक निलेशला पक्षात मी घेतलं. निलेशला मनापासून आधार मी दिला. मी आताही निलेशला विकासकामांसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणातली मदत केली आहे, असं अजित पवार म्हणाले.

‘त्याच्या डोक्यात काही लोकांनी हवा घातलीय की…’

“तो कालच माझ्याकडे आला होता. मी त्याला नीट समजावून काही गोष्टी सांगितल्या आहेत. पण त्याच्या डोक्यात काही लोकांनी एक हवा घातली आहे की, तू खासदार होशील. वास्तविक तसं नाहीय. निलेश पारनेरपुरता लोकप्रिय म्हणून काम करु शकतो. पण बाकी मतदारसंघामध्ये तो समजतो तेवढं सोपं नाही. मी त्याला सांगितलं होतं. आता शेवटी समजावून सांगयाची जेवढी गरज होती, तेवढं मी केलं होतं”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

दरम्यान, निलेश लंके शरद पवार गटात जातील, अशी गेल्या चार ते पाच दिवसांपासून चर्चा सुरु आहे. पण निलेश लंके यांनी दोन दिवसांपूर्वी या चर्चांचं खंडन केलं होतं. आपण अजित पवार गटातच असल्याचं ते म्हणाले होते. याशिवाय ते आजही मोकळेपणाने माध्यमांशी बोलताना दिसत नाहीयत. त्यामुळे ते आगामी काळात काय राजकीय पाऊल उचलतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.