Pune-Lonavla local : सर्व पुणे-लोणावळा लोकल 22 ऑगस्टपर्यंत पुन्हा सेवेत दाखल होणार, 50 हजार प्रवाशांचा त्रास कमी होणार

प्रवाशांनी सांगितले की सर्व लोकल ट्रेन सेवा पुन्हा सुरू करणे ही चांगली बातमी आहे. "दररोज सुमारे 40,000 ते 50,000 लोक या लोकलमधून प्रवास करतात.

Pune-Lonavla local : सर्व पुणे-लोणावळा लोकल 22 ऑगस्टपर्यंत पुन्हा सेवेत दाखल होणार, 50 हजार प्रवाशांचा त्रास कमी होणार
सर्व पुणे-लोणावळा लोकल 22 ऑगस्टपर्यंत पुन्हा सेवेत दाखल होणार, 50 हजार प्रवाशांचा त्रास कमी होणार
Image Credit source: twitter
महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Aug 08, 2022 | 9:11 AM

पुणे: पुणे रेल्वे विभाग (Pune Railway Department)  22 ऑगस्टपर्यंत पुणे ते लोणावळा (Pune To Lonawala) दरम्यानच्या सर्व लोकल ट्रेन पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. “सध्या पुणे ते लोणावळा दरम्यान लोकल ट्रेनच्या 13 जोड्या सुरू आहेत. कोरोना (Corona) महारामारीच्या काळात बंद करण्यात आलेल्या सर्व लोकल गाड्या अद्याप सुरु करण्यात आल्या नव्हत्या. परंतु 22 ऑगस्टपर्यंत सर्व 40 जोड्या लोकल ट्रेन टप्प्याटप्प्याने चालवल्या जाणार आहेत. तसेच आणखी चार लोकल ट्रेन 8 ऑगस्टपासून सुरू होतील, तर सहा सेवा 15 ऑगस्टपासून सुरू होईल. 22 ऑगस्टपासून पुणे-लोणावळा मार्गावरील आणखी चार लोकल गाड्या पुन्हा सुरू होतील अशी माहिती पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.

97 टक्के एक्स्प्रेस गाड्या पुन्हा सुरू झाल्या

पुणे आणि मुंबई दरम्यानच्या गाड्यांप्रमाणे लोणावळ्याला जाणाऱ्या लोकल गाड्या दोन्ही शहरांमधील सर्व स्थानकांवर थांबतील अशी सुद्धा माहिती मिळाली आहे. पुण्यातून निघणाऱ्या सुमारे 97 टक्के एक्स्प्रेस गाड्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. “फक्त काही गाड्या उरल्या आहेत, आणि त्याही लवकरच सुरू होतील.

हे सुद्धा वाचा

पुण्यातून 20 एक्स्प्रेस गाड्या सुटतात

प्रवाशांनी सांगितले की सर्व लोकल ट्रेन सेवा पुन्हा सुरू करणे ही चांगली बातमी आहे. “दररोज सुमारे 40,000 ते 50,000 लोक या लोकलमधून प्रवास करतात. अधिक गाड्या ही काळाची गरज आहे आणि आमच्यासाठी दररोजचा त्रास कमी होईल अशी माहिती एका प्रवाशाने दिली आहे. काही गाड्या वगळता एक्स्प्रेस गाड्यांमध्ये बेडिंग सेवा पुरवल्या जात असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुण्यातून 20 एक्स्प्रेस गाड्या सुटतात. सध्या त्यापैकी 13 गाड्यांमध्ये बेडिंग सेवा पुरविली जाते. इतर सात गाड्यांमध्ये लवकरच बेडिंग सेवा दिली जाण्याची शक्यता आहे. या वर्षी 9 एप्रिल रोजी, सर्व गाड्यांमधील बेड रोल सेवा पूर्व-महामारी काळाप्रमाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक रेल्वे अधिकार्‍यांनी सांगितले की, दोन वर्षांहून अधिक काळ वापर न करता गोदामात ठेवल्यामुळे अनेक बेड रोल खराब झाले होते आणि कंत्राटदार नवीन तागाची खरेदी करण्याच्या प्रक्रियेत होते म्हणून पुन्हा सुरू होण्यास वेळ लागला.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें