AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : ‘…तर बागेश्वर बाबांना 21 लाख देऊ आणि अंनिस बंद करू’; नेमकं कोणतं आव्हान दिलंय?

बागेश्वर बाबांना अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेलं चॅलेंज ते स्वीकारणार का? थेट अंनिस बंद करून टाकू असं जाहीरपणे सांगितलं आहे. नेमकं कोणतं आव्हान दिलं आहे ते जाणून घ्या.

Pune : '...तर बागेश्वर बाबांना 21 लाख देऊ आणि अंनिस बंद करू'; नेमकं कोणतं आव्हान दिलंय?
bageshwar dham
| Updated on: Nov 23, 2023 | 8:12 PM
Share

पुणे : देशभर प्रसिद्ध असलेल्या बागेश्वर बाबांनी अनेक चमत्कार दाखवलेत. आपल्या दरबारामध्ये आलेल्या भक्ताच्या मनातलं ओळखतात, सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहिले आहेत. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा बागेश्वर बाबांचं पुण्यात दर्शन घेतलं होतं. पुण्यात बाबांच दरबार भरला होता यावेळी त्यांच्या भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पाहायला मिळाली होती. अशातच बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्रींना जाहीरपणे आव्हान दिलं आहे.

बागेश्वर बाबांना कोणी दिलंय आव्हान

बागेश्वर बाबांंना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे खुलं आव्हान दिलं आहे. बंद पाकिटातील नोटांच्या बंडलमधील सांगितलेला नंबर ओळखल्यास 21 लाखांच बक्षीस देऊ. इतकंच नाहीतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती बंद करू अस बॉण्ड पेपरवर लिहून देऊ असे खुलं आव्हान अंनिसचे मिलिंद देशमुख यांनी बागेश्वर बाबांना दिलं आहे. बागेश्वर बाबा स्वीकारणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बागेश्वर बाबा यांनी संत तुकाराम आणि साई बाबांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आता पुण्यात आल्यावर तुकारामांबाबत केलेल्या वक्तव्याची त्यांनी माफी मागितली होती. संत तुकारामांना त्यांची पत्नी मारत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे बागेश्वर बाबा पुण्यात तुकारामांच्या दर्शनासाठी गेल्यावर मंदिराला पोलिसांनी बंदोबस्त दिला होता.

पुणे शहरात बागेश्वर धाम महाराज यांचा कार्यक्रम 21 ते 22 नोव्हेंबर रोजी जगदीश मुळीक फाउंडेशनकडून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाआधी भाजप आणि अजित पवार गटामध्ये वाद पेटला होता. बागेश्वर बाबांनी संत तुकारामांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अजित पवार गटातील राष्ट्रवादीचे नेते सुदर्शन जगदाळे यांने पोस्ट करत  या कार्यक्रमाल विरोध दर्शवला होता.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.