AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMC election 2022 : धायरी-आंबेगाव नाही, तर औंध-बालेवाडी आता सर्वात मोठा प्रभाग; मतदार यादीच्या दुरुस्तीनंतर नवी आकडेवारी समोर

धायरी-आंबेगावमध्ये मतदारांची संख्या कमी होण्यामागे विविध कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील एक लाखांहून अधिक मतदार असलेला हा एकमेव मतदार प्रभाग होता. त्यामुळे अधिकार्‍यांना मतदार यादी पडताळण्यासाठी जास्तीचे प्रयत्न करण्यास सांगितले होते.

PMC election 2022 : धायरी-आंबेगाव नाही, तर औंध-बालेवाडी आता सर्वात मोठा प्रभाग; मतदार यादीच्या दुरुस्तीनंतर नवी आकडेवारी समोर
पुणे महापालिकाImage Credit source: tv9
| Updated on: Jul 22, 2022 | 6:41 PM
Share

पुणे : पुणे महानगरपालिकेने आगामी निवडणुकीसाठी (PMC election 2022) मतदार यादी अंतिम केल्याने, धायरी-आंबेगावच्या जागी औंध-बालेवाडी सर्वाधिक मतदार असलेला मतदार प्रभाग बनला आहे. तर मगरपट्टा-साधना विद्यालयात सर्वात कमी मतदार आहेत. पीएमसीने नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवताना आगामी नागरी निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी (Draft electoral roll) जाहीर केली होती. त्याच्या प्रारूप मतदार यादीत, मागील नागरी निवडणुकांच्या तुलनेत शहरातील मतदारांची संख्या आठ लाखांहून अधिक वाढली आहे. 2017मध्ये, 26,34,798 मतदार होते, तर आता 34,54,639 मतदार 58 मतदार प्रभागांमध्ये पसरले असून प्रत्येकी तीन नगरसेवक निवडले जातील, एक निवडणूक प्रभाग वगळता ज्यामध्ये दोन नगरसेवक (Corporator) असतील. नागरिकांना प्रारूप मतदार यादीची पडताळणी करून त्यांच्या मतदार प्रभागातील मतदार यादीत त्यांची नावे बरोबर असल्याची खात्री करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

प्रारूप मतदार यादीची पडताळणी

ज्या मतदारांचे नाव भारतीय निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत आहे, परंतु महापालिकेद्वारे प्रकाशित केलेल्या प्रारूप मतदार यादीत नाही, त्यांना स्वतःचा समावेश करण्यासाठी जवळच्या प्रभाग कार्यालयात जाण्यास सांगण्यात आले आहे.

प्रभागातील मतदार

धायरी-आंबेगाव प्रभागात सर्वाधिक 1,03,959 मतदार होते, परंतु ते 30,165 मतदारांनी घटून 73,784 इतके झाले. अशाप्रकारे, आता सर्वाधिक मतदारांची संख्या औंध बालेवाडी येथे 82,504 मतदार असून त्यानंतर महंमदवाडी-उरुळी देवाची येथे 76,976 मतदार आहेत. मगरपट्टा-साधना विद्यालय वॉर्ड हा सर्वात कमी मतदारांसह 33,825 मतदार असलेला निवडणूक प्रभाग राहिला. 25 निवडणूक प्रभागांमध्ये मतदारांची संख्या कमी झाली आहे, तर एकूण 58 प्रभागांपैकी 27 निवडणूक प्रभागांमध्ये त्यांची संख्या वाढली आहे. शहरातील एकूण मतदार संख्येत किरकोळ घट झाली आहे, असे निवडणूक विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

मतदार यादीत चुकीने समावेश

धायरी-आंबेगावमध्ये मतदारांची संख्या कमी होण्यामागे विविध कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील एक लाखांहून अधिक मतदार असलेला हा एकमेव मतदार प्रभाग होता. त्यामुळे अधिकार्‍यांना मतदार यादी पडताळण्यासाठी जास्तीचे प्रयत्न करण्यास सांगितले होते. असे आढळून आले, की हे क्षेत्र तीन निवडणूक प्रभागांमध्ये विभागले गेले होते, परंतु धायरी-आंबेगाव अंतर्गत बहुतेक मतदार जोडले गेले आहेत. तसेच, लगतच्या मतदार प्रभागातील मतदारांच्या नावांचे डुप्लिकेशन होते आणि शेजारील ग्रामीण भागात राहणार्‍या अनेक मतदारांचा मतदार यादीत चुकीने समावेश झाला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या प्रक्रियेत सुमारे 3.5 लाख मतदारांची दुरुस्ती करण्यात आली.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.