शरद पवारांचा अजित पवारांना दे धक्का; दोन बडे नेते पुण्यात पवारांच्या भेटीला

Sharad Pawar Vidhansabha Election 2024 : शरद पवार आज पुण्यात आहे. त्यांच्या भेटीसाठी काही नेते येत आहेत. यात अजित पवार गटातील दोन बड्या नेत्यांचाही समावेश आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या राजकारणात मोठे बदल होणार असल्याचे संकेत दिसत आहेत. वाचा सविस्तर...

शरद पवारांचा अजित पवारांना दे धक्का; दोन बडे नेते पुण्यात पवारांच्या भेटीला
शरद पवार, अजित पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Sep 30, 2024 | 11:02 AM

विधानसभा निववडणुकीआधी शरद पवारांनी रणनिती आखायला सुरूवात केली आहे. पुणे जिल्ह्यात नव्याने पक्षाला उभं करण्यासाठी त्यांनी रणनिती आखली आहे. जुन्या सहकाऱ्यांच्या भेटीगाठी ते घेत आहेत. आद शरद पवार पुण्यात आहेत. पुण्यातील मोदी बागेत असणाऱ्या शरद पवारांच्या निवास्थानी नेते आणि कार्यकर्त्याची भेटीसाठी गर्दी झाली आहे. यातच अजित पवार गटाचे दोन नेते शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यामुळे पुण्यात आणि सोलापुरात राजकीय बदलाचे संकेत दिसत आहेत. दोन बडे नेते शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहे.

दोन बडे नेते शरद पवारांच्या भेटीला

अजित पवार गटाचे दोन मोठे नेते शरद पवार यांना भेटण्यासाठी आले आहेत. सोलापूरमधील माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे हे शरद पवारांना भेटण्यासाठी आले आहेत. बबन शिंदे पुन्हा शरद पवार गटात येण्यासाठी इच्छुक आहेत. पिंपरी चिंचवडचे अजित पवार गटाचे नेते विलास लांडे हे देखील सरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. विलास लांडे यांनी मागे भोसरी विधानसभेची निवडणूक लढवली होती. विलास लांडे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या दोन नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने हे दोघेही शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

बबन शिंदे शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर सुप्रिया सुळे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा आमचे सगळ्यांशी प्रेमाचे संबध आहेत. मोहिते पाटील, बबन शिंदे, पवार साहेब यांचे जुन संबध आहेत. बबन शिंदे यांचे पवार साहेबांसोबत खुप जुने संबध आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

भोसरीचे ठाकरे गटाचे नेते रवी लांडगे शरद पवारांच्या भेटीला आले आहेत. भोसरी विधानसभेवर ठाकरे गटाकडून दावा करण्यात येत आहे. भोसरीत सहकार्य करावे रवी लांडगे आज शरद पवारांना विनंती करणार आहेत. भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी सुरु आहे. अशातच रवी लांडगे शरद पवारांच्या भेटीला आले आहेत.

Non Stop LIVE Update
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण..
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले....
ठाकरेंच्या या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन
ठाकरेंच्या या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन.
उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, 'मातोश्री'बाहेर महायुतीची बॅनरबाजी
उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, 'मातोश्री'बाहेर महायुतीची बॅनरबाजी.
रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल
रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल.
भाजपवर बोलताना नाना पटोलेंची जीभ घसरली, 'त्या' वक्तव्यानं नवा वाद
भाजपवर बोलताना नाना पटोलेंची जीभ घसरली, 'त्या' वक्तव्यानं नवा वाद.
एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिर सजलं, विठुच्या महापूजेचा मान यंदा कोणाला?
एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिर सजलं, विठुच्या महापूजेचा मान यंदा कोणाला?.
गुवाहाटी.. रेल्वे अन् विमान तिकीट, शहाजीबापू आणि ठाकरे यांच्यात जुंपली
गुवाहाटी.. रेल्वे अन् विमान तिकीट, शहाजीबापू आणि ठाकरे यांच्यात जुंपली.
'धनुभाऊंसाठी कमळ असतं तर...', पंकजा मुंडेंचं भर सभेत मोठं वक्तव्य
'धनुभाऊंसाठी कमळ असतं तर...', पंकजा मुंडेंचं भर सभेत मोठं वक्तव्य.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कोणाचं सरकार येणार? महायुती की मविआ?
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कोणाचं सरकार येणार? महायुती की मविआ?.