लोकसभा निवडणूक संपताच शरद पवारांचा दुष्काळी दौरा; म्हणाले, नुसती शेती एके शेती…

NCP Leader Sharad Pawar Dushkal Daura : शरद पवार सध्या बारामती आणि परिसरात दुष्काळी दौरा करत आहेत. स्थानिकांशी संवाद साधत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना शेती करताना कोणती काळजी घ्यावी? यावर भाष्य केलं आहे. शरद पवार पवार नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

लोकसभा निवडणूक संपताच शरद पवारांचा दुष्काळी दौरा; म्हणाले, नुसती शेती एके शेती...
शरद पवारImage Credit source: Sharad Pawar Facebook
Follow us
| Updated on: Jun 12, 2024 | 8:32 PM

लोकसभा निवडणूक संपताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळी दौरा सुरु केल आहे. शरद पवारांनी बारामती आणि पुरंदर तालुक्यातील गावांना शरद पवार भेटी देत आहेत. पुरंदर तालुक्यातील वाल्हे, नीरा या गावांना भेटी दिल्यानंतर पवार पुरंदर तालुक्यातील कोळविहरे गावात पाहणी करत आहेत. शरद पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तेव्हा शेतीसोबतच जोडधंदा करण्याचा सल्ला शरद पवार यांनी दिला. नुसतं शेती एक शेती करून चालणार नाही. इतरही व्यवसाय करावे लागतील. एमआयडीसी तरूणांना रोजगार देते.एमआयडीसीला पर्याय नाही, असं शरद पवार म्हणाले.

पवारांचा शेतकऱ्यांशी संवाद

पुरंदर तालुक्यातील कोळविहरे गावात शरद पवार पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेती आणि जोडधंदा यावर शरद पवारांनी स्थानिकांना मार्गदर्शन केलं. दीर्घ स्वरूपाच्या उपाययोजना काय करता येईल. संदर्भात माहिती घेण्यासाठी मी आलोय. राज्य सरकारकडे जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संयुक्त बैठक घेणार आहे. वातावरण बदलले आहे मात्र समाधानकारक नाही. निवडणूक झाली तुम्ही काही कमतरता पडू दिली नाही. पावसाची कमतरता आहे मात्र मतांची पडू दिली नाही. मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन हे प्रश्न कायमस्वरूपी कसे सोडवता येईल. याबाबत आग्रह धरू, असं शरद पवार म्हणाले.

जोडधंदा करण्याचा सल्ला

पुणे जिल्हा एकेकाळी शिक्षणाचे माहेरघर होते. पुण्याला कारखाना द्यायचा नाही. कारखाना द्यायचा असेल तर बाहेर द्यायचा असा निर्णय मी त्यावेळी घेतला होता. शेती एक शेती करून चालणार नाही. एमआयडीसीला पर्याय नाही. याबाबत राज्य सरकारशी उद्योग खात्याशी चर्चा करणार आहे. जिथे शक्य आहे तिथे एमआयडीसी आणणार आहे. देशात सरकार आलं. यावेळी आलेले सरकार दुसऱ्याची मदत घेऊन आलं आहे. हे सरकार फार दिवस राहील असं वाटत नाही. कालच्या निवडणुकीत जी मदत केली तीच मदत येणाऱ्या निवडणुकीत पण करा, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

स्थानिकांची पवारांपुढे कैफियत

पुरंदर तालुक्यातील दुष्काळी दौऱ्यात स्थानिकांनी शरद पवारांपुढे कैफियत मांडली. या भागात नेत्यांच्या जमिनी आहेत. विजय शिवतारे यांची 450 एकर जमीन आहे. तर अशोक टेकवडे यांची 500 एकर जमिनी आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीवर ताबा मारला असा आरोप स्थानिकांनी केला. यावर मार्ग काढण्याचं आवाहन स्थानिकांनी शरद पवारांना केलं. त्यावर नेत्यांचे गाव असल्याचा टोला शरद पवारांनी लगावला.

Non Stop LIVE Update
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?.
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?.
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी.
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?.
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम.
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.