AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : चाणक्यांच्या या 4 गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, आयुष्यात यशस्वी व्यक्ती व्हाल

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये माणसाची दिनचर्या कशी असावी? याबाबत चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्यातीलच काही गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Chanakya Niti : चाणक्यांच्या या 4 गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, आयुष्यात यशस्वी व्यक्ती व्हाल
Chanakya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 20, 2026 | 9:07 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही आपली उपयोगिता सिद्ध करतात. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये समाजात वावरताना व्यक्तीचं वर्तन कसं असावं? समाजासोबत त्याचा व्यवहार कसा असावा? व्यक्तीने आपल्या आयुष्याचं व्यवस्थापन कसं करावं? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचसोबत चाणक्य यांनी व्यक्तीचं वैयक्तिक आयुष्य कसं असावं? वैयक्तिक स्थरावर व्यक्तीने आपल्या आयुष्याचं व्यवस्थापान कसं करावं? आणि काय काळजी घ्यावी? याबद्दल देखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यातीलच काही गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. चाणक्य म्हणतात तुम्ही जेव्हा सकाळी झोपेतून उठता तेव्हा या चार गोष्टी नित्यनियमाने करा तुम्ही आयुष्यात एक यशस्वी व्यक्ती व्हाल.

सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी करा हे काम – चाणक्य म्हणतात तुम्ही जेव्हा सकाळी झोपेतून उठता, तेव्हा सगळ्यात आधी एक काम करायचं, ते म्हणजे तुमचं दिवसभराचं वेळापत्रक बनवा. यामध्ये तुम्हाला दिवसभरात कोणती कामं करायची आहेत? त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं? जर एखादं काम दिवसभरात पूर्ण झालं नाही तर तुमचं किती नुकसान होऊ शकतं? आपल्याला दिवसभरात कोणाकोणाला भेटायचं आहे. हे सगळं सकाळी झोपेतून जागं होताच ठरवून घ्या. त्यामुळे तुमच्या कामात सुसूत्रता येईल. तुमच्या वेळीची बचत होईल, तसेच तुम्हाला तुमच्या कामाचा प्राधान्यक्रम ठरवताना या गोष्टींचा खूप फायदा होईल. सर्व काम व्यवस्थित पार पडतील, असं चाणक्य सांगतात.

आरोग्याची काळजी घ्या – आर्य चाणक्य म्हणतात जेव्हा माणसाची तब्येत उत्तम असेल तेव्हाच तो कोणतंही काम चांगल्याप्रकारे करू शकतो. जर तुमची तब्येत उत्तम नसेल तर तुम्ही कोणतंही काम करा, त्यामध्ये तुमचं लक्ष लागणार नाही. परंतु जर तुमची तब्येत उत्तम असेल तर तुम्ही कोणतही कार्य चांगल्या प्रकारे करू शकता. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या, सकाळी उठल्यानंतर थोडा वेळ तरी व्यायाम करा असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

वेळेचं व्यवस्थापन – चाणक्य म्हणतात माणसानं वेळेचं व्यवस्थापन करण्यासाठी शिकलं पाहिजे. आपल्याला दिवसभरात कोण कोणती कामं करायची आहेत? आणि त्यासाठी किती वेळ लागणार आहे? हे सकाळीच निश्चित करा असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

उद्दिष्ट नेहमी लक्षात ठेवा – चाणक्य म्हणतात प्रत्येक कामामागे कोणती तरी प्रेरणा असते, प्रेरणेशिवाय कोणतंही काम हे व्यर्थ असतं. त्यामुळे माणसानं नेहमी आपलं उद्दिष्ट लक्षात ठेवलं पाहिजे, आणि त्या दिशेनं काम केलं पाहिजे. आयुष्यात तुम्हाला यश नक्की मिळणार.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ.
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून......
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात.
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप...
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप....
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक.
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं.
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ.
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली.