बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या पोस्टरवर शाईफेक; सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Supriya Sule on Sunetra Pawar Poster ShaiFek in Karhati : वहिनीच्या पोस्टरवर शाईफेक; बारामतीतील काऱ्हाटीच्या घटनेवर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया. म्हणाल्या, जे काही झालं ते... बारामतीच्या उमेदवारीवरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. पाहा सुप्रिया सुळे काय म्हणाल्या...

बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या पोस्टरवर शाईफेक; सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Follow us
| Updated on: Feb 11, 2024 | 3:15 PM

बारामती, पुणे | 11 फेब्रुवारी 2024 : शरद पवार गट आणि अजित पवार गट असे राष्ट्रवादीत दोन गट पडलेले असतानाच पवारांच्या बारामतीत एक घटना घडली. बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना विजयी करा असा बॅनर लागला होता. बॅनरवर शाईफेक करण्यात आली आहे. या घटनेची बारामतीसोबतच राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. कोणी केली आहे, याची चौकशी झाली पाहिजे. हे जे केलंय ते चुकीचं आहे. कुणाचाही बॅनर लावला असेल त्याच्यावर शाही फेकणं हे अतिशय चुकीचं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

बारामती लोकसभेच्या उमेदवारीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या…

आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं. देशात लोकशाही आहे. त्यामुळे कोणीतरी विरोधात लढलंच पाहिजे. लोकशाहीत विरोधक असला पाहिजे मात्र तो दिलदार असला पाहिजे.लोकांना दम देणं ह्या गोष्टी महाराष्ट्रात शोभत नाहीत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

बारामती दौऱ्यावर भाष्य

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी कार्यकर्त्यांची संवाद साधल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विविध मुद्द्यावर त्या बोलत होत्या. बारामती मतदार संघातील लोक अनेक कामे घेऊन मुंबईत येत असतात. त्यामुळे मी बारामतीत नागरिकांना येऊन भेटते. बारामती लोकसभा मतदारसंघापुढे पाणी, बेरोजगारी आणि हमीभाव ही मोठी आव्हाने उभी आहेत. मी सातत्याने पाण्याच्या टँकरची मागणी करीत आहेत..याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राज्यात देखील बेरोजगारी मोठ्या संख्येने वाढत आहे.शेतीला हमीभाव नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. रूरल इंडियाचा डेटा सांगतो हमीभाव नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. मी गेल्या काही दिवसांपासून सरकारला विनंती करीत आहे. पण सरकारकडून सकारात्मक प्रतिक्रिया येत नाही, असंही त्या म्हणाल्या.

Non Stop LIVE Update
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका.