AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News | वाहतूक कोंडीत पुणे, मुंबई नाही तर हे शहर ठरले आघाडीवर

pune traffic jam | पुणे शहरात देशात सर्वाधिक वाहने आहेत. पुणे शहरात नेहमी वाहतूक कोंडी होत असते. याविषयावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही अनेकवेळा भाष्य केले आहे. परंतु एका अहवालात राज्याचे दुसरेच शहर वाहतूक कोंडीत प्रथम आले आहे.

Pune News | वाहतूक कोंडीत पुणे, मुंबई नाही तर हे शहर ठरले आघाडीवर
traffic jam in puneImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 03, 2023 | 12:36 PM
Share

पुणे | 3 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरातील वाहतूक कोंडीची चर्चा नेहमी होत असते. या वाहतूक कोंडीमुळे पुणे शहरात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नवीन उड्डण पूल उभारले गेले आहेत. एकेरी वाहतूक केली गेली आहे. त्यानंतर पुणे शहरातील वाहतूक कोंडी कायम असते. यामुळे पुणे प्रदूषणाची पातळी जास्त असते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याविषयावर अनेकवेळा सार्वजनिक व्यासपीठावरुन मत मांडले आहे. पुण्याची वाढ रोखण्याचा सल्ला ते देत असतात. त्यावेळी जगभरातील  कोंडीसंदर्भात अमेरिकन संस्थेचा अहवाल समोर आला आहे.

वाहतूक कोंडीत देशातील तीन शहरे टॉप टेनमध्ये

वाहतुककोंडीमुळे पुणेकरांचा प्रवास जिकारीचा होता. सर्वात मंद गतीने हलणाऱ्या वाहनांमुळे पुणेकरांना चार, पाच किलोमीटर जाण्यासाठी अनेकवेळा तासभर वेळ लागतो. परंतु वाहतूक कोंडीच्या यादीत टॉप टेन शहरांमध्ये पुणे किंवा मुंबई शहर नाही. राज्यातील दुसऱ्याच शहराचे नाव यासाठी पुढे आले आहे. अमेरिकन संस्थेने केलेला हा अहवाल आहे. त्यात जगभरातील पहिल्या दहा शहरांमध्ये भारतामधील एकूण 3 शहरे आहेत. त्यात पुणे नाही.

महाराष्ट्रातील कोणतं शहर यादीत?

अमेरिकेतील नॅशनल ब्यूरो ऑफ इकोनॉमिक्स रिसर्च (National Bureau of Economic Research) म्हणजेच NBER या संस्थेचा हा अहवाल आहे. या संस्थेने जगभरातील अहवालामध्ये भारतामधील पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता, बिहारमधील आरा या शहरासह महाराष्ट्रातील एका शहराचा समावेश आहे. त्यात पुणे आणि मुंबई नाही. तर भिवंडी या शहराचा समावेश आहे.

कसा केला अभ्यास

एनबीईआर या संस्थेकडून जग भरातील 152 देशांमधील 1,200 पेक्षा जास्त शहरांचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर वाहतूक कोंडी असलेल्या टॉप टेन शहरांची नावे सांगितले. त्यात अमेरिकेतील फ्लिंट शहरातील वाहतुकीचा वेग फारच संथ असल्याचे म्हटले आहे. तसेच बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये 4.5 किमी प्रवासासाठी तासभर लागत असल्याचे म्हटले आहे. अर्थात वाहतूक कोंडीत हेच शहर जगभरात पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकन संस्थेचा हा अहवाल पुणेकरांसाठी चर्चेचा ठरला आहे.

Follow Us
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.
गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून 30 लाखांचा गंडा
गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून 30 लाखांचा गंडा.
गॅस सिलेंडरसाठी मुंबईकर रांगेत; कांदिवलीत बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप
गॅस सिलेंडरसाठी मुंबईकर रांगेत; कांदिवलीत बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप.
सिलेंडर तुटवड्यावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
सिलेंडर तुटवड्यावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने.
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये..
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये...
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक.
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत.
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद.
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा.
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त.