पिंपरी चिंचवडमध्ये बॉम्ब सापडला, शहरात एकच खळबळ

पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी आहे.. शहरातील मध्य वस्तीत असलेल्या कोहिनूर इमारतीच्या परिसरात खोदकाम सुरु असताना एक बॉम्ब सापडलाय. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये बॉम्ब सापडला, शहरात एकच खळबळ
पिंपरी चिंचवडमध्ये बॉम्ब......

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी आहे.. शहरातील मध्य वस्तीत असलेल्या कोहिनूर इमारतीच्या परिसरात खोदकाम सुरु असताना एक बॉम्ब सापडलाय. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा शेल बॉम्ब असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. हा बॉम्ब जिवंत आहे की नाही या बाबत बॉम्बनाशक पथक शोध घेत आहे.

नेमकं काय घडलं?

दुपारी 10 ते 12 च्या दरम्यान पिंपरी मधील कोहिनूर सोसायटीच्या आवारात खोदकाम सुरू असताना जेसीबी चालकाला हा बॉम्ब आढळून आला. यावेळी उपस्थितांनी तत्काळ सोसायटी मधील चेअरमन यांना ही घटना कळवली. त्यामुळे तात्काळ पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ त्या ठिकाणी आपल्या टीम सोबत पोहचले. तोपर्यंत पुण्याहून बॉम्बनाशक पथक निघाले होते. हे पथक येतातच ज्या ठिकाणी बाँब आढळून आला त्या ठिकाणी पाहणी करत तो बाँब सील करून तपासणी साठी घेऊन गेले आहेत…

यापूर्वीही ब्रिटिशकालीन बॉम्ब पिंपरी परिसरात सापडले आहेत

हा शेल बॉम्ब असल्याची माहिती पिंपरी पोलिसांनी दिलीय हा बॉम्ब जिवंत आहे की नाही या बाबत बॉम्ब नाशक पथक शोध घेत आहे. बाँब नाशक पथकाने पाहणी केल्यानंतर जेसीबीच्या बकेटमध्ये वाळूची पोती टाकून त्यात बॉम्ब सदृश वस्तू ठेऊन पुढील तपासणीसाठी नेण्यात आली आहे. यापूर्वी देखील अशा प्रकारचे ब्रिटिशकालीन बॉम्ब पिंपरी परिसरात सापडले आहेत. हे बॉम्ब अनेक वर्षांपासून जमिनीवर पडलेले असून ते खोदकामाच्या वेळी उघडकीस येत आहेत.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI