Brahman Mahasangh : देवेंद्र फडणवीस ब्राह्मण असल्यानंच भाजपानं त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही; ब्राह्मण महासंघाचा आरोप

राज्यात राजकीय घडामोडी घडल्या. हिंदुत्ववादी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले, आनंद झाला. ब्राह्मण समाजाविरोधा वक्तव्ये करणारे वाचाळवीर राष्ट्रवादीचे सरकार जाणे गरजेचे होते, असे गोविंद कुलकर्णी म्हणाले.

Brahman Mahasangh : देवेंद्र फडणवीस ब्राह्मण असल्यानंच भाजपानं त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही; ब्राह्मण महासंघाचा आरोप
गोविंद कुलकर्णी/देवेंद्र फडणवीस
Image Credit source: tv9
प्रदीप गरड

|

Jul 01, 2022 | 6:20 PM

पुणे : राज्यात संपूर्ण बहुमत असूनदेखील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सत्तेपासून दूर ठेवले गेले आणि केवळ ते ब्राह्मण असल्यानेच भाजपाने त्यांना मुख्यमंत्री होऊ दिले नाही, असा आरोप ब्राह्मण महासंघाचे (Brahman Mahasangh) अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केला आहे. त्यासोबतच भाजपा जाणूनबुजून ब्राह्मण समाजाचे खच्चीकरण करत असल्याचा आरोपदेखील कुलकर्णी यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री करण्याचा भाजपाने निर्णय घेतला असल्याचे काल दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. यावेळी आपण मंत्रिमंडळात नसणार. बाहेरून हे सरकार कसे चालले आहे, यावर लक्ष ठेवणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. नंतर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने आदेश देत फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास सांगितले. यासर्व घडामोडींवर गोविंद कुलकर्णी यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

‘राष्ट्रवादीचे सरकार जाणे गरजेचे होते’

राज्यात राजकीय घडामोडी घडल्या. हिंदुत्ववादी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले, आनंद झाला. ब्राह्मण समाजाविरोधा वक्तव्ये करणारे वाचाळवीर राष्ट्रवादीचे सरकार जाणे गरजेचे होते, असे गोविंद कुलकर्णी म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये न जाता मार्गदर्शकाची भूमिका बजावण्याचे जाहीर केले. त्यांचा हा निर्णय योग्य होता. त्यामुळे त्यांची राजकीय प्रतिष्ठा खूप वाढली. पण भाजपाने दबाव आणून योजनापूर्वक त्यांचे खच्चीकरण केले. त्यांचे डिमोशन केले, असा आरोप कुलकर्णी यांनी केला.

हे सुद्धा वाचा

‘आधी नितीन गडकरी, मग प्रकाश जावडेकर आता फडणवीस’

नितीन गडकरी यांच्यासोबत देखील याआधी भाजपाने मुद्दाम असाच खेळ केला असल्याचा आरोप देब्राह्मण महासंघाकडून करण्यात आला आहे. गडकरी यांना केवळ पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतून हटवण्यासाठी भाजपाने नितीन गडकरींचे खच्चीकरण केले. त्यांच्यासह प्रकाश जावडेकर आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत भाजपाने दबाव आणल्याचा आरोप गोविंद कुलकर्णी यांनी केला. दरम्यान, उपमुख्यमंत्रीपदाची काल देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर आज आपला पदभार स्वीकारला आहे. आपण नाराज नसल्याचे स्पष्टीकरणही फडणवीस यांनी दिले आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें