AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Caves of Junnar | जुन्नर तालुक्यातील लेण्यांची परदेशी पाहुण्यांना भुरळ; लेण्यांत ध्यान साधनेचा घेतला अनुभव

जुन्नर येथील बुद्ध लेण्या पाहून व येथील लेण्यांत विपश्यना करून मन प्रसन्न झाले . या लेण्यांचा इतिहास ऐकून दोन हजार वर्षांपूर्वीचा भारत कसा होता त्याची प्रचिती आम्हाला आली असल्याची भावना पर्यटक मारिया यांनी व्यक्त केली.

Caves of Junnar | जुन्नर तालुक्यातील लेण्यांची परदेशी पाहुण्यांना भुरळ; लेण्यांत ध्यान साधनेचा  घेतला अनुभव
Junnar cave
| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 7:14 PM
Share

जयवंत शिरतर , पुणे – जिल्ह्यातील जुन्नर तालुका देशभरात उत्कृष्ट लेण्यांसाठी प्रसिदध आहे. सर्वाधिक लेणी असलेला तालुका म्हणूनही जुन्नर प्रसिद्ध आहे. जुन्नरमध्ये असलेल्या या लेण्यांना नुकतीच रशियातील पर्यटकांनी ( Tourists from Russia) भेट दिली. रशिया येथील मारिया यांच्या सोबत वेरेनोका उत्यानस्काया,अफानसेव,लिलियाना आदी रशियन पर्यटक जुन्नरच्या लेणी (Caves of Junnar) पाहण्यासाठी आले होते. या परदेशी पाहुण्यांनी पर्यटकांनी खानापूर येथील मानमोडी डोंगरावरील तसेच शिवनेरी किल्ल्यावरील बुद्ध लेणीस भेट दिली व तेथील विहारांत विपश्यना ध्यान साधना (Meditation)केली. यावेळी या पाहुण्यांना सिद्धार्थ कसबे,सुदर्शन साबळे यांनी लेण्यांची माहिती दिली.

परंपरा जप्त केली ध्यानधारणा जुन्नरच्या बुद्ध लेणी या दोन हजार वर्षांपूर्वीच्या असून त्यांचा वापर बौद्ध भिक्खु हे राहण्यासाठी तसेच ध्यानधारणेसाठी करत असत. तीच परंपरा जपत या परदेशी पाहुण्यांनीही या लेण्यांत ध्यान साधनेचा अनुभव घेतला. याठिकाणी विपश्यना करून मन प्रसन्न झाल्याची भावना पाहुण्यांनी व्यक्त केली.  जुन्नर येथील बुद्ध लेण्या पाहून व येथील लेण्यांत विपश्यना करून मन प्रसन्न झाले असल्याची भावना पर्यटक मारिया यांनी व्यक्त केली या लेण्यांचा इतिहास ऐकून दोन हजार वर्षांपूर्वीचा भारत कसा होता त्याची प्रचिती आम्हाला आली. भारताचा हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असेही त्या म्हणाल्या.

लेण्यांचा विकास करणे गरजेचे

जुन्नर तालुक्यात लेण्या पाहण्यासाठी अनेक विदेशातील पर्यटक येत असतात या लेण्यांकडे जाण्यासाठी आजही व्यवस्थित मार्ग नसुन कुठेही दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत.जुन्नर मध्ये जागतिक पर्यटक येण्यासाठी येथील लेण्यांचा विकास करणे गरजेचे असल्याचे मत लेणी अभ्यासक मकरंद लंकेश्वर यांनी व्यक्त केले. यावेळी जुन्नरचे डॉ.अमोल पुंडे यांनी जुन्नरची ग्रामीण संस्कृती त्यांना समजाऊन सांगितली.रशियन पर्यटकां सोबत लेणी अभ्यासक मकरंद लंकेश्वर,विनोद रायकर,प्रकाश वनवे उपस्थित होते.

कोण कोणाला कॉपी करतंय? मांजरीचा हा Cute workout video पाहा आणि तुम्हीच ठरवा!

भजे घेण्यासाठी रेल्वेतून उतरला खाली अन् ट्रेन सुरु झाली! पुढे जे घडलं ते चांगलंच अंगलट आलं…

Nitesh Rane Arrest : नितेश राणेंना मोठा झटका, 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी! सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाचा निकाल

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.