मध्य रेल्वेने भंगाराचंही सोनं केलं! भंगार विकून कमावले तब्बल 57 कोटी 29 लाख

मध्य रेल्वेने भंगार साहित्यातून मुक्तता मिळविण्यासाठी झिरो स्क्रॅप मिशन हा अत्यंत चांगला उपक्रम हाती घेतला आहे. विशेष म्हणजे रेल्वेच्या या उपक्रमाचे काैतुकही केले जात आहे. कारण या उपक्रमामुळे रेल्वे स्टेशनचा परिसर स्वच्छ आणि सुंदर होण्यास मदत होणार आहे. रेल्वेने विकलेल्या या भंगारामध्ये मध्य रेल्वेचे सर्व विभाग, कार्यशाळा, शेड आणि विविध डेपोमधील सर्व भंगार विक्री करण्यात आले.

मध्य रेल्वेने भंगाराचंही सोनं केलं! भंगार विकून कमावले तब्बल 57 कोटी 29 लाख
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 07, 2022 | 11:46 AM

मुंबई : मध्य रेल्वेने (Central Railway) दोन महिन्यांमध्ये तब्बल 57 कोटी 29 लाखांचे भंगार विकले आहे. मध्य रेल्वेच्या प्रत्येक विभागातील आणि कार्यशाळेमधील हे भंगार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये डब्बे, वॅगन, लोकोमोटिव्ह स्क्रॅप रुळ आदींचा समावेश आहे. दरवर्षीच रेल्वे भंगार विकत असते. मात्र, यंदा गेल्या वर्षींच्या तुलनेमध्ये जास्त महसूल (Revenue) रेल्वेला मिळाला आहे. 2021 मध्ये रेल्वेला 9 कोटी 21 लाखांचा महसूल मिळाला होता. यामुळे यंदा महसूलमध्ये भरघोस वाढ झाल्याचे दिसते आहे. दरवर्षी मध्य रेल्वे भंगाराची विल्हेवाट लावत असते. यामधून मोठा महसूल देखील रेल्वेला (Railway) मिळतो.

मध्य रेल्वेचा झिरो स्क्रॅप मिशन उपक्रम

मध्य रेल्वेने भंगार साहित्यातून मुक्तता मिळविण्यासाठी झिरो स्क्रॅप मिशन हा अत्यंत चांगला उपक्रम हाती घेतला आहे. विशेष म्हणजे रेल्वेच्या या उपक्रमाचे काैतुकही केले जात आहे. कारण या उपक्रमामुळे रेल्वे स्टेशनचा परिसर स्वच्छ आणि सुंदर होण्यास मदत होणार आहे. रेल्वेने विकलेल्या या भंगारामध्ये मध्य रेल्वेचे सर्व विभागातील भंगार साहित्य, कार्यशाळेतील साहित्य, शेड आणि विविध डेपोमधील सर्व भंगार विक्री करण्यात आले. या भंगार सामग्रीमध्ये स्क्रॅप रूळ, पर्मनंट-वे सामग्री, भंगार वापरात नसलेले साहित्य डब्बे लोकोमोटिव्ह इत्यादींचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

रेल्वेचे महाव्यवस्थापक लाहोटी म्हणाले…

रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी म्हणाले की, रेल्वे फक्त महसूलसाठीच भंगार विकत नाहीतर यामुळे परिसर देखील स्वच्छ होण्यास मदत होते. शून्य स्क्रॅप मिशनचा एक भाग म्हणून कार्यशाळा, शेड आणि विविध डेपोवर असलेले भंगार हटविण्यात येते. यामुळे रेल्वे स्टेशनचा परिसर स्वच्छ राहतो. आपण नेहमी पाहिले असेल की, स्टेशन परिसरामध्ये रेल्वेचे विविध साहित्य पडलेले असते. यामुळे अस्वच्छता मोठ्या प्रमाणात दिसते. हेच टाळण्यासाठी रेल्वेने हा खास उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले जात आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें