AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रकांत पाटील काल म्हणाले, मी परत जाईन, आज म्हणाले पुन्हा येईन

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात केलेल्या आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलंय.

चंद्रकांत पाटील काल म्हणाले, मी परत जाईन, आज म्हणाले पुन्हा येईन
भाजपच कार्यकारिणीची बैठक
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Dec 26, 2020 | 4:51 PM
Share

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (26 डिसेंबर) पुण्यात पत्रकार परिषद घेऊन अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात केलेल्या आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलंय. आपण पुण्यात स्थायिक होणार नसून मी कोल्हापूरला जाणार असल्याचं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. आता त्यांनी मी कोल्हापूरला जाणार असल्याच्या वक्तव्यानंतर कुणीही हुरळून जाऊ नये, घाबरुन जाऊन नये असं स्पष्टीकरण दिलंय. माझ्या वक्तव्यांवर उलटसुलट चर्चा झाल्यानेच आपण हे स्पष्टीकरण देत असल्याचं त्यांनी म्हटलं (Chandrakant Patil comment on his statement over returning to Kolhapur from Pune).

चंद्रकांत पाटील म्हणाले, “माझ्या कोल्हापूरमध्ये परतण्याच्या वक्तव्यावर बरीच उलटसुलट चर्चा झाली. त्यामुळेच मला आज ही पत्रकार परिषद घ्यावी लागली. माझ्या त्या वक्तव्याने कुणी हुरळून जाऊ नये किंवा घाबरुनही जाऊ नये. मला ते बोलताना इतकी चर्चा होईल असं वाटलं नाही. माझं वाक्य असं होतं की केंद्राने मला दिलेलं मिशन पूर्ण होत नाही तोपर्यंत मी कुठेही जात नाही. केंद्राने मला सहजासहजी असंच पुण्यात पाठवलेलं नाही.”

“माणसाला आयुष्याच्या शेवटी कुठेतरी सेटल व्हायचं असतं. त्यासाठी माशेलकरांना गिरीश बापट यांनी पुणं सेटल होण्यासाठी चांगलं असल्याचा सल्ला दिला. त्यावर मी म्हटलं की पुणं खूप चांगलं आहे. पण मी मिशन पूर्ण झाल्यानंतर माझ्या कोल्हापूरला जाईल. त्यासाठी 5,15 किंवा 20 वर्षे असा कितीही वेळ लागू शकतो,” असंही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं.

चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे :

– मी कोल्हापूरला परत जाणार या माझ्या वाक्याने कोणी हुरळून जाऊ नये, घाबरून जाऊ नये. – केंद्राने मला सहजासहजी पाठवलं नाही. – माझं जे मिशन आहे ते पूर्ण झाल्याशिवाय जाणार नाही. – 1980 ते 1993 या काळात मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसाठी घर सोडलं होतं. – पुढच्या निवडणुकीला अजून खूप वेळ आहे – मला सेटल व्हायला 2200 लोकसंख्येचे खालापूर आवडेल – अजित पवारांना काय पडलय आमचं, त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं, त्यांनी शरद पवारांनंतर त्यांना काय स्थान राहील ते विचारावं – मला माझा पक्ष काय म्हणतो हे महत्त्वाचे – कोल्हापुरात तीन पक्ष वेगळे लढतात हे नाटक आहे, ते सगळे एकत्र आहेत – अजून दोन महापौर यायचेत, मला फक्त कोथरूडची निवडणूक लढवण्यासाठी पाठवलं नाही, मला जे करायचयं ते खूप मोठं आहे – कालचा संदर्भ हा लगेच बॅग उचलून जाण्याचा नाही

हेही वाचा :

चंद्रकात पाटील म्हणजे चंपारण्यातील पात्र : वडेट्टीवार

तुम्हाला बोलवलंच नव्हतं, परत जाईन म्हणणाऱ्या चंद्रकांतदादांना अजित पवारांचा टोला

दिल्लीतील शेतकरी आंदोलन राजकीय आंदोलन : चंद्रकांत पाटील

पुण्यात प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं, पण मी कोल्हापूरला परत जाणार: चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil comment on his statement over returning to Kolhapur from Pune

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...