AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हाला बोलवलंच नव्हतं, परत जाईन म्हणणाऱ्या चंद्रकांतदादांना अजित पवारांचा टोला

कोल्हापूरला परत जाईन असं म्हणणाऱ्या चंद्रकांतदादांना पुणेकरांनी बोलावलंच नव्हतं, असा टोमणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.

तुम्हाला बोलवलंच नव्हतं, परत जाईन म्हणणाऱ्या चंद्रकांतदादांना अजित पवारांचा टोला
चंद्रकांत पाटील आणि अजित पवार
| Updated on: Dec 26, 2020 | 12:11 PM
Share

पुणे :  कोल्हापूरला परत जाईन असं म्हणणाऱ्या चंद्रकांतदादांना पुणेकरांनी बोलावलंच नव्हतं, असा टोमणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी लगावला. “एक म्हणतो पुन्हा येईन तर दुसरा म्हणतो परत जाईन, तुम्हाला बोलावलंय कुणी..??”, अशा खास पुणेरी स्टाईल कोपरखळ्या अजित पवार यांनी फडणवीस (Devendra Fadanvis) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांना लगावल्या. (DCm Ajit pawar taunt Chandrakant Patil)

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. यानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादात जोरदार राजकीय फटकेबाजी केली. ‘पुन्हा येईन, परत जाईन’ अशी भाषा करणाऱ्यांना जनतेने बोलावलंच नाही, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

“चंद्रकांतदादांना पुणेकरांनी बोलावलंच नव्हतं. त्यांच्यामुळे भाजपच्या नेत्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर अन्याय झाला”, असंही सांगायला अजित पवार विसरले नाहीत. “बरं चंद्रकांत दादा पुण्यात आलेच आहेत तर मग एका वर्षातच परत जाण्याची भाषा का? असा सवाल करताना कोथरुडकरांनी त्यांना पाच वर्षासाठी निवडून दिलंय. उद्या जर कोथरुडकर काही काम घेऊन गेले तर मी परत जाणार आहे, असं चंद्रकांतदादा सांगणार आहेत का?”, अशी टोलेबाजी अजित पवार यांनी केली.

राष्ट्रवादीत इनकमिंग, भाजपला गार गार वाटतंय

“ज्यावेळी आमच्यातले कार्यकर्ते नेते भाजपमध्ये प्रवेश करत होते त्यावेळी त्यांना उकळ्या फुटत होत्या. त्यांची तिकडे कामं होत नाहीत म्हणून ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, असं सांगत तेव्हा भाजपवाले फिरत होते. पण आता काही लोक आमच्याकडे यायला सुरुवात झाली आहे. मग आता भाजपला का राग येतोय… त्यांची तिकडे कामं होत नसतील म्हणूनच ते आमच्याकडे येत आहेत. आता कसं वाटतंय, गार गार वाटतंय ना…”, अशा शब्दात अजित पवारांनी भाजपला टोले लगावले.

इनकमिंगचा मुहूर्त सांगून निघत नसतो

गेल्या महिन्याभरापासून भाजपचे काही कार्यकर्ते आणि नेते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. यामुळे राष्ट्रवादीत मोठ्या इनकमिंगच्या चर्चा आहेत. येत्या काळात कोणकोणते नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार? मुहूर्त ठरला आहे का? असा प्रश्न अजित पवारांना पत्रकारांनी विचारला. यावर इनकमिंगचा मुहूर्त सांगून निघत नसतो, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

एकनाथ खडसेंना आलेल्या ईडीच्या नोटीसीबद्दल मला माहिती नाही

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ईडीने नोटीस पाठवलेली आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अगदी काही महिन्यांतच त्यांना ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. याचविषयी अजित पवारांना विचारलं असता याबद्दल मला माहिती नाही. खडसेंशी याबद्दल माझी चर्चा झालेली नाही. मी देखील वर्तमानपत्र आणि चॅनेलला ही बातमी ऐकली आहे, असं अजित पवार म्हणाले.

(DCm Ajit pawar taunt Chandrakant Patil)

हे ही वाचा :

पुण्यात प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं, पण मी कोल्हापूरला परत जाणार: चंद्रकांत पाटील

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.