पुण्यात प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं, पण मी कोल्हापूरला परत जाणार: चंद्रकांत पाटील

पुणे असं आहे की, याठिकाणी प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं. | Chandrakant Patil

पुण्यात प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं, पण मी कोल्हापूरला परत जाणार: चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Dec 25, 2020 | 8:11 PM

पुणे: कोल्हापूर सोडून पुण्यातून विधानसभेची निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना विरोधकांकडून कायम लक्ष्य केले जाते. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील आता आपण पुणे सोडून कोल्हापूरात परतणार असल्याचे वक्तव्य केले आहे. (Chandrakant Patil says I will go back to Kolhapur)

ते शुक्रवारी पुण्यातील अटल संस्कृती गौरव पुरस्काराचे वितरण सोहळ्यात बोलत होते. या कार्यक्रमाच्या मंचावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, पुणे असं आहे की, याठिकाणी प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं. पण देवेंद्र मी तुम्हाला सांगतो, मी कोल्हापूरला परत जाणार आहे. विशेषत: मला विरोधकांना ही गोष्ट सांगायची आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

कोल्हापुरातून निवडून नाही आलो तर हिमालयात जाईन; चंद्रकांतदादा कडाडले

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर ऐवजी पुण्यातील कोथरुडमधून निवडणूक लढली. मात्र, तो विषय त्यांच्यासाठी नेहमीच अडचणीचा ठरला आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावर चंद्रकांत पाटलांना सातत्याने टोमणे मारले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय. मी आजही कोल्हापूरमधून निवडणूक लढवायला तयार आहे. जर कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केले होते.

मी आताही कोल्हापुरातून निवडणूक लढवायला तयार आहे. मी जर कोल्हापूरमधून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन. पुण्यात सुरक्षित मतदारसंघ म्हणून नव्हे, तर पक्षाने आदेश दिल्यामुळे निवडणूक लढवली. माझी कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची तयारी होती, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले होते.

‘चंद्रकांत पाटील यांचे डिपॉझिट जप्त करण्याची ताकद आमच्याकडे आहे’

चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूरातून निवडणूक लढवण्याच्या आव्हानाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तुळजापूर किंवा कोल्हापुरमधून निवडणूक लढवूनच दाखवावी. आम्ही त्यांचे डिपॉझिट जप्त करून दाखवू, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला होता.

तुळजापूर विधानसभा ही भाजपकडे आहे. त्या आमदारांचा राजीनामा घ्या आणि भाजपची हिंमत असेल तेथील आमदाराचा राजीनामा घेऊन चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवावी. त्यांना पराभूत कसे करायचे हे आम्ही दाखवून देऊ, असे नवाब मलिक यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

चंद्रकांतदादांना हिमालयात जावं लागणार नाही; मुश्रीफ यांची टोलेबाजी सुरूच

चंद्रकांत पाटील शब्दाचे पक्के आहेत, त्यांनी खरंच हिमालयात जायला पाहिजे: अब्दुल सत्तार

कोल्हापुरातून निवडून नाही आलो तर राजकारण सोडून हिमालयात जाईन -चंद्रकांत पाटील

(Chandrakant Patil says I will go back to Kolhapur)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.