Pune Station : पुणे रेल्वे स्थानकात आता मुलांसाठी ‘Child friendly room’, काय वैशिष्ट्य? वाचा सविस्तर

पुणे रेल्वे स्थानकाच्या (Pune railway station) प्रवेश/एक्झिट गेट क्रमांक 1 जवळ असलेल्या बालस्नेही जागेचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाला एचएफसीएफच्या प्रमुख कॅरोलिन ऑडॉयर डी वाल्टर आणि पुणे रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Pune Station : पुणे रेल्वे स्थानकात आता मुलांसाठी 'Child friendly room', काय वैशिष्ट्य? वाचा सविस्तर
पुणे रेल्वे स्थानकातील चाइल्ड फ्रेंडली रूमImage Credit source: Pratham Gokhale/HT
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 7:30 AM

पुणे : पुणे रेल्वे विभाग आणि होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन (HFCF) यांनी संयुक्तपणे पुणे रेल्वे स्थानक याठिकाणी मुलांसाठी चाइल्ड फ्रेंडली रूम (Child friendly room) तयार केली आहे. ही जागा मुलांना आरामदायक वाटेल याची खात्री करण्यासाठी डिझाइन केलेली खोली आहे. त्यात लहान पॅन्ट्री व्यवस्था आणि लायब्ररी आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही सुविधा अडचणीत असलेल्या मुलांना समुपदेशनदेखील करणार आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी नुकतेच पुणे रेल्वे स्थानकाच्या (Pune railway station) प्रवेश/एक्झिट गेट क्रमांक 1 जवळ असलेल्या बालस्नेही जागेचे उद्घाटन केले. यावेळी स्थानिक पोलीस अधिकार्‍यांना बालस्नेही पाच जॅकेट सुपूर्द करण्यात आली. कार्यक्रमाला एचएफसीएफच्या प्रमुख कॅरोलिन ऑडॉयर डी वाल्टर आणि पुणे रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘बाल-अनुकूल मानसिकता ठेवण्याची गरज’

कार्यक्रमाला एचएफसीएफच्या प्रमुख कॅरोलिन ऑडॉयर डी वाल्टर आणि पुणे रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बाल-अनुकूल कक्षाचे उद्घाटन केल्यानंतर शर्मा म्हणाल्या, की केवळ पायाभूत सुविधांचा विकास करून चालणार नाही तर समाजातील प्रत्येकाने बाल-अनुकूल मानसिकता ठेवण्यासाठी आपली भूमिका बजावली पाहिजे.

मुलांची तस्करी

लैंगिक आणि कामगार शोषणासाठी भारतात हजारो मुले बेपत्ता होतात किंवा त्यांची तस्करी होते. या मुलांची ने-आण करण्यासाठी रेल्वे बहुतेकदा सर्वात सोयीस्कर मार्ग आहे. रेल्वे स्थानकांवर येणारी अनेक मुले गंभीर हिंसाचार किंवा अत्याचाराला बळी पडतात, असे मत वाल्टर यांनी मांडले.

‘जागरूकता उपक्रम राबविणार’

पुढे, पालक, मुले, सामान्य प्रवासी आणि समाज या सर्वांना मुलांना होणाऱ्या हिंसाचाराची जाणीव व्हावी आणि आवश्यकतेनुसार ते सुरक्षा जाळी म्हणून काम करू शकतील याची खात्री करण्यासाठी संपूर्ण रेल्वे स्थानक परिसरात जागरूकता उपक्रम राबविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.