कोरोनाचे सुपर स्प्रेडर ते सारीच्या रुग्णांचाही शोध घेणार; वाचा, पुणे पालिकेचा डिटेल अ‍ॅक्शन प्लान

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. (Classes in schools, colleges suspended, night restrictions return in Pune)

कोरोनाचे सुपर स्प्रेडर ते सारीच्या रुग्णांचाही शोध घेणार; वाचा, पुणे पालिकेचा डिटेल अ‍ॅक्शन प्लान
अजित पवार

पुणे: कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी घरोघरी जाऊन सुपर स्प्रेडर शोधण्यापासून ते कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्यापर्यंतचे निर्णय घेतानाच सारी तापाचे रुग्ण शोधण्याचाही निर्णय घेण्यात आला. यावेळी कोरोना रोखण्यासाठीचा अ‍ॅक्शन प्लानही तयार करण्यात आला. (Classes in schools, colleges suspended, night restrictions return in Pune)

पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थिती उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार वंदना चव्हाण, महापौर मुरलीधर मोहोळ, महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीए चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, डॉ.डी. बी.कदम आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही परिस्थितीत कोरोनावर नियंत्रणात ठेवा

कोरोना विषाणूची सद्यस्थिती व प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत, तसेच लसीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर आवश्यक ते उपाय सुचवून त्यांची तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करा. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सूक्ष्म नियोजन करा. शहर व ग्रामीण भागात हॉटस्पॉटनिहाय अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवा. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात प्रभावी उपाययोजना राबवा. संपर्क शोध मोहीम (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) अधिक प्रभावीपणे राबवा. शासकीय आणि खाजगी प्रयोगशाळांमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करुन नमुना तपासण्या वाढवा. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे सुपर स्प्रेडर व सारी रुग्णांचे सर्वेक्षण करा, असे सांगून कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार होवून संसर्ग रोखण्यात खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी त्यांनी फ्ल्यू सदृश्य रुग्णांची तपासणी करुन घ्यावी, अशा सूचना पवार यांनी यावेळी केल्या.

त्रिसूत्री पाळा

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी गर्दीत जाणे टाळणे, सामाजिक अंतर पाळणे, मास्क, सॅनिटायझरचा वापर आदी प्रशासनाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे, असे सांगून पवार म्हणाले, 200 व्यक्तींच्या मर्यादेत लग्न, कौटुंबिक व राजकीय कार्यक्रम होतील याची दक्षता घ्या. जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालये 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवावीत. मात्र अभ्यासिका निम्या क्षमतेने नियम पाळून सुरू राहतील याची खात्री करा. हॉटेल, बार रात्री 11 पर्यंतच सुरु राहतील याची दक्षता घ्या, असे सांगून रात्री 11 ते सकाळी 6 दरम्यान नियंत्रित संचाराची अंमलबजावणी करा. वृत्तपत्र, दूध, भाजीपाला, फळे, औषधे या अत्यावश्यक सेवांना सूट द्या. जिल्ह्यात सर्वत्र कोविड केअर सेंटर तात्काळ सुरु करा. मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. आरोग्य व्यवस्था सक्षम होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना गतीने करा, असे सांगून ससून रुग्णालयाला आवश्यक मनुष्यबळ व यंत्र सामुग्री पुरविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

मंत्री, खासदारांच्या सूचना

शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. त्याचबरोबर ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम करणे आवश्यक आहे, असं दिलीप-वळसे पाटील यांनी सांगितलं. तर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, अशा परिस्थितीत शासकीय रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांचेही सहकार्य आवश्यक आहे, असं स्पष्ट केलं. खासदार गिरीश बापट यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करुन रुग्णांना वेळेत सेवा-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी सूचना केली.

फ्ल्यू सदृश्य रुग्णांची कोरोना टेस्ट बंधनकारक

कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सूक्ष्म नियोजन करण्यावर प्रशासनाचा भर असणार आहे. शहर व ग्रामीण भागात हॉटस्पॉटनिहाय अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवा. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात प्रभावी उपाययोजना राबवा. संपर्क शोध मोहीम (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) अधिक प्रभावीपणे राबवा. शासकीय आणि खाजगी प्रयोगशाळांमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करुन नमुना तपासण्या वाढवा. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे सुपर स्प्रेडर व सारी रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार होवून संसर्ग रोखण्यात खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची भूमिका महत्त्वाची असल्याने यासाठी त्यांनाही फ्ल्यू सदृश्य रुग्णांची कोरोना टेस्ट करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे, असं पुणे पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितलं. (Classes in schools, colleges suspended, night restrictions return in Pune)

महत्त्वाचे निर्णय

>> जिल्ह्यात लॉकडाऊन नाही; मात्र नियमांची कडक अंमलबजावणी

>>  200 व्यक्तींच्या मर्यादेत लग्न, कौटुंबिक व राजकीय कार्यक्रम

>> रात्री 11 ते सकाळी 6 दरम्यान नियंत्रित संचाराची अंमलबजावणी (अत्यावश्यक सेवा- वृत्तपत्र, दूध, भाजीपाला, फळे, औषधे वगळून)

>> हॉटस्पॉट भागावर अधिक लक्ष केंद्रीत करा.

>> मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करुन उपाययोजना प्रभावीपणे राबवा.

>> जिल्ह्यात कोविड केअर सेंटर सुरु करा.

>> नमुना तपासण्यांची संख्या वाढवा.

>> मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा.

>> नियम पाळून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. (Classes in schools, colleges suspended, night restrictions return in Pune)

पुण्यात कधी किती रुग्ण आढळले?

10 फेब्रुवारी

– दिवसभरात 239 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– पुण्यात करोनाबाधीत 06 रुग्णांचा मृत्यू. 01 रूग्ण पुण्याबाहेरील.

11 फेब्रुवारी

– दिवसभरात 256 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– पुण्यात करोनाबाधीत 1 रुग्णांचा मृत्यू

12 फेब्रुवारी

– दिवसभरात 258 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– पुण्यात करोनाबाधीत 07 रुग्णांचा मृत्यू. 02 रुग्ण पुण्याबाहेरील

13 फेब्रुवारी

– दिवसभरात 331 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– पुण्यात करोनाबाधीत 06 रुग्णांचा मृत्यू. 04 रूग्ण पुण्याबाहेरील 07

14 फेब्रुवारी

– दिवसभरात 354 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– पुण्यात करोनाबाधीत ०४ रुग्णांचा मृत्यू. ०१ रूग्ण पुण्याबाहेरील.

15 फेब्रुवारी
…….
– दिवसभरात 193 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– पुण्यात करोनाबाधीत 4 रुग्णांचा मृत्यू. 2 रूग्ण पुण्याबाहेरील.

16 फेब्रुवारी

– दिवसभरात 309 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– पुण्यात करोनाबाधीत 3 रुग्णांचा मृत्यू. 2 रूग्ण पुण्याबाहेरील.

17 फेब्रुवारी

– दिवसभरात 428 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– पुण्यात करोनाबाधीत 7 रुग्णांचा मृत्यू. 3 रूग्ण पुण्याबाहेरील.

18 फेब्रुवारी

– दिवसभरात 465 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– पुण्यात करोनाबाधीत 9 रुग्णांचा मृत्यू. 3 रूग्ण पुण्याबाहेरील.

19 फेब्रुवारी

– दिवसभरात 527 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– पुण्यात करोनाबाधीत 7 रुग्णांचा मृत्यू. 3 रूग्ण पुण्याबाहेरील.

20 फेब्रुवारी

– दिवसभरात 414 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– पुण्यात करोनाबाधीत 6 रुग्णांचा मृत्यू. 1 रूग्ण पुण्याबाहेरील.

– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 197330
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2561
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- 189948  (Classes in schools, colleges suspended, night restrictions return in Pune)

 

संबंधित बातम्या:

लॉकडाऊन, संचारबंदी, नवे हॉटस्पॉट, नवे निर्बंध, विदर्भात कोणत्या जिल्ह्यात काय?; वाचा स्पेशल रिपोर्ट

पुण्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, अजित पवारांनी अधिकाऱ्यांना बजावलं, म्हणाले, ‘या सूचनांचं पालन झालंच पाहिजे!’

सावधानता बाळगा अन्यथा कोरोना पुन्हा येईल; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा इशारा

(Classes in schools, colleges suspended, night restrictions return in Pune)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI