AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तक्रार करा, अन् १०० रुपये मिळवा, पुणे शहरात सुरु केला प्रकार

Pune News and PMPML : पुणे अन् पिंपरी चिंचवडसाठी सार्वजनिक वाहतूक हे मोठे साधन आहे. यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी नवनवीन प्रयोग सुरु आहे. प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी हे प्रयोग सुरु आहे.

तक्रार करा, अन् १०० रुपये मिळवा, पुणे शहरात सुरु केला प्रकार
| Updated on: Jul 13, 2023 | 9:01 AM
Share

योगेश बोरसे, पुणे : पुणे शहरात वाहतुकीचे सर्वात मोठे साधन म्हणजे पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) आहे. लाखो पुणेकरांचा प्रवास या बसेसने होत असतो. पुणे महानगर परिवहन महामंडळही अनेक नवनवीन प्रयोग करुन प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहेत. परिवहन महामंडळाकडे नव्या बसेस दाखल होत आहेत. काही बसेस वातानुकूलित आहेत. रेल्वे स्टेशन, स्वारगेट आणि शिवाजीनगर या ठिकाणी काही मिनिटांच्या अंतरावर बसेस उपलब्ध आहेत. आता प्रवाशांना चांगली सेवा मिळावी म्हणून आणखी एक उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

कोणी केला उपक्रम सुरु

पीएमपीचे अध्यक्ष संचिद्र प्रताप सिंह यांनी नुकताच पदाची सूत्र हाती घेतली. त्यानंतर सर्वात पहिला प्रयोग त्यांनी बस चालक आणि वाहकांना शिस्त लावण्यासाठी सुरु केला. त्यासाठी काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वत: बसस्थानकावर उभे राहून सामान्याप्रमाणे प्रवास केला. त्यावेळी बस स्थानकावर न थांबणे, चालक अन् वाहकांची वागणूक याचे चांगले, वाईट अनुभव त्यांना आला. त्यामुळे आता चालकांना शिस्त लावण्यासाठी त्यांनी नवीन उपक्रम सुरु केला आहे.

तक्रार करा, अन् १०० रुपये मिळवा

पीएमपी अध्यक्षांचा बेशिस्त चालकांना दणका देण्यासाठी नवीन उपक्रम सुरु केला. त्यांनी बेशिस्त चालकांची तक्रार करणाऱ्या प्रवाशाला 100 रुपये देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पीएमपीचे नवीन अध्यक्ष सचिंद्रप्रताप सिंह यांनी बेशिस्त बस चालकावर करणार कारवाई करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. पदभार स्वीकारताचं त्यांनी हा निर्णय घेतला.

मुलांची क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक

पुण्यात पीएमपी बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलांची वाहतूक सुरु आहे. शाळकरी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरु आहे. शाळेतून घरी जाताना विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा नसल्यानं विद्यार्थी लोंबकळत प्रवास करत आहेत. पुण्यातल्या शास्त्री रोडवर हा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थी बसला लोंबकळत जीवघेणा प्रवास करत आहेत. यामुळे पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

हे ही वाचा

चालकाने बस थांबवली नाही, तो व्यक्ती बससाठी धावत होतो, मग संदेश आला अन् चालकाचे धाबे दणाणले

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.