AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोमय्यांच्या सत्कारानंतर पायऱ्यांवर गोमूत्र टाकून शुद्धीकरण, स्टंटबाजीचा काँग्रेसकडून निषेध

गेल्या शनिवारी किरीट सोमय्यांना धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर आज भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन करत सत्कार केला. मात्र आता काँग्रेसने त्या पायऱ्यावर गोमूत्र आणि गुलाबपाणी टाकून भाजपच्या स्टंबाजीचा निषेध केला आहे.

सोमय्यांच्या सत्कारानंतर पायऱ्यांवर गोमूत्र टाकून शुद्धीकरण, स्टंटबाजीचा काँग्रेसकडून निषेध
काँग्रेसकडून पायऱ्यांचं शुद्धीकरण
| Edited By: | Updated on: Feb 11, 2022 | 6:52 PM
Share

पुणे : काही वेळापूर्वीच किरीट सोमय्यांचा (Kirit Soamya) पुणे महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर सर्व विरोध झुगारून भाजपने सत्कार केला. याच पायऱ्यांवर गेल्या शनिवारी किरीट सोमय्यांना धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर आज भाजपने (Bjp) जोरदार शक्तीप्रदर्शन करत सत्कार केला. मात्र आता काँग्रेसने (Congress) त्या पायऱ्यावर गोमूत्र आणि गुलाबपाणी टाकून भाजपच्या स्टंबाजीचा निषेध केला आहे. किरीट सोमय्या यांच्या येण्यामुळे याठिकाणी मोठा राडा झाला. पुणेकरांच्या प्रश्नासाठी किरीट सोमय्या कधी आले नाहीत, मात्र आता फक्त कंगावा करायला सोय्या इथे येत आहेत. त्यामुळे त्यांचा निषेध आहे. अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांच्याविरोधात काँग्रेसकडून देण्यात आलीय. तसेच आम आदमी पार्टीनेही पुण्यात महापालिकेसमोर आंदोलन केलं आहे. किरीट सोमय्या येणार होते म्हणून कुणालाही प्रवेश दिला नाही, गिरीश बापट दिडशे लोकं आत घेऊन घुसतात, हे निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया आम आदमी पार्टीकडून देण्यात आली आहे.

उद्धव ठाकरेंचं घोटाळेबाज सरकार

संजय राऊतांनी बेनामी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी हट्ट केला नसता तर लोकांचा जीव वाचला असता. हात तोडा, पाय तोडा, जीव गेला तरी चालेल. काहीही करा पण किरीट सोमय्या यांना गप्प बसवा असे आदेश शिवसेनेकडून देण्यात आल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. काहीही झालं तरी आम्ही गप्प बसणार नाही. या घोटाळेबाजांना जेलमध्ये बसवणार, असा निर्धारही किरीट सोमय्यांनी केला आहे. कोविडची कमाई बंद झाल्यानंतर संजय राऊत वाईन कंपनीत कमाई करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुजीत पाटकर आणि संजय  राऊत यांच्या पार्टनर्शिप आहे, असा थेट आरोप सोमय्यांनी केला आहे. संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावा लागणार आहे, कोविडमधील घोटाळे बाहेर आल्यावर यांना तोंड दाखवायला जागा मिळणार नाही, असेही सोमय्या म्हणाले आहेत.

विरोध झुगारून भाजपकडून सत्कार

एवढा गदारोळ झाल्यानंतर आज सोमय्या पुन्हा पुण्यात गेले आहेत. ज्या पायऱ्यांवर सोमय्यांना धक्काबुक्की झाली त्याच पायऱ्यांवर त्यांचा सत्कार करण्याचा घाट भाजपने घातला होता. मात्र काँग्रेसकडून लगेच विरोधाची हाक देण्यात आली. महापालिकेनेही सोमय्यांच्या सत्काराला परवानगी नाकारली. मात्र ज्या पायऱ्यांवर धक्काबुक्की झाली त्याच पायऱ्यावर भाजपने विरोध झुगारून सोमय्यांचा सत्कार केला आहे. आज सोमय्यांच्या स्वागताला भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. यावेळी गर्दी अनावर झाल्याने पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर करण्यात आला. त्यामुळे परिसरात सध्या तणावाचं वातावरण आहे. भाजपकडून यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं.

VIDEO: राजभवनात थुई थुई नाचणारे मोर आणि विषारी नागही येतात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

संजय राऊत तुम्ही फडणवीसांच्या घराबाहेर याच आम्ही बघू, भाजपचं राऊतांना थेट आव्हान

Pune | ठाकरेंच्या बेनामी कंपनीवर कारवाई झाल्याशिवाय गप्प बसणार नाही, पालिकेच्या पायरीवरून सोमय्यांनी ललकारले

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.