पिंपरी चिंचवडमध्ये तरुणांना कोरोनाचा विळखा, एकूण 64 रुग्णांपैकी तरुण रुग्णांची संख्या…

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा आता 64 वर पोहोचला आहे. यामध्ये तरुण रुग्णांची संख्या जास्त आहे (Corona infection among youth).

पिंपरी चिंचवडमध्ये तरुणांना कोरोनाचा विळखा, एकूण 64 रुग्णांपैकी तरुण रुग्णांची संख्या...

पुणे : पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेअंतर्गत येणाऱ्या परिसरातही (Corona infection among youth) ‘कोरोना’चा विळखा वाढताना दिसत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा आता 64 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे या 64 रुग्णांपैकी 43 रुग्ण हे 40 वर्षांखालील आहेत. या रुग्णांचं प्रमाण एकूण 67 टक्के आहे. यात 12 वर्षांखालील तब्बल 8 रुग्ण आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे (Corona infection among youth).

पिंपरी चिंचवडमध्ये 6 रुग्ण हे 13 ते 21 वयोगटातील आहेत. 21 ते 40 वयोगटातील तब्बल 28 रुग्ण आहेत. 40 ते 59 वयोगटातील 17 आणि 60 पेक्षा जास्त वयाची 4 रुग्ण आहेत. 40 वर्षांखालील रुग्णांचं प्रमाण 67 टक्के आहे. हे रुग्ण तरुण असल्यामुळे त्यांच्यात चांगली रोगप्रतिकार क्षमता आहे. त्यामुळे ते लवकर बरे होतील, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तर पिंपरी चिंचवडचा कोरोना मृत्यूदर हा 1.61 टक्के इतका आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्यामुळे प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जात आहे. शहरात कडक संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. विनाकारण मोकाट फिरणाऱ्या तसेच मास्क न वापरणाऱ्यांवर कलम 188 नुसार 273 तर सीआरपीसी 149 नुसार 133 जणांवर कारवाई करण्यात येत आहे.

भाजीपाला केंद्रांवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील वेगवेगळ्या भागातील मोकळ्या मैदानात 21 फळे आणि भाजीपाला विक्री केंद्र सुरु केले आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या महिन्याभरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या 5 हजार 156 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांना सर्वसामान्य तपासणीसाठी शहरात विविध ठिकाणी पालिकेचे 36 दवाखाने उपलब्ध करुन दिले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये आतापर्यंत 1518 जणांची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 1446 जणांचा अहवाल निगेटिव्ह तर 72 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्वेक्षण केलेल्या नागरिकांची संख्या 12 लाख 75 हजार 657 इतकी आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आतापर्यंत 2954 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत.

पुण्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात एक पोलीस कर्मचारी हा पिंपरी-चिंचवडमधील पोलीस वसाहतीत वास्तव्यास आहे. त्यामुळे पोलीस वसाहतमधील एक इमारत सील करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी आणि मुलाला रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे.

संबंधित बातम्या :

‘मी शपथ घेतो की..’, संचारबंदीचे नियम मोडणाऱ्यांसाठी पालघर पोलिसांकडून शपथ

सुनेला प्रसव वेदना, रात्रीच्या अंधारात सासू-सुनेची पायपीट, वर्दीतल्या साहेबांची माणुसकी

अतिरिक्त निर्बंध, तरीही पुणेकर ऐकेनात, सर्व बंद असूनही चिकन दुकान उघडलं, नागरिकांच्या रांगा

जे जोडे घालून वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली, ते जोडे विकून कोरोना लढ्यासाठी 3 लाख, गोल्फर अर्जुन भाटीचं कौतुक

औरंगाबादमध्ये ‘कोरोना’बाधित महिलेच्या अंत्यविधीला शेकडोंची गर्दी!

नवी मुंबईत एकाच IT कंपनीतील 40 पैकी 19 कर्मचाऱ्यांना कोरोना, अन्य कर्मचाऱ्यांच्या रिपोर्टची प्रतीक्षा

Published On - 4:58 pm, Wed, 22 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI