नवी मुंबईत एकाच IT कंपनीतील 40 पैकी 19 कर्मचाऱ्यांना कोरोना, अन्य कर्मचाऱ्यांच्या रिपोर्टची प्रतीक्षा

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे (New Mumbai Corona update). नवी मुंबईच्या महापे येथील एका आयटी कंपनीच्या 40 पैकी 19 कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

नवी मुंबईत एकाच IT कंपनीतील 40 पैकी 19 कर्मचाऱ्यांना कोरोना, अन्य कर्मचाऱ्यांच्या रिपोर्टची प्रतीक्षा

नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे (New Mumbai Corona update). नवी मुंबईच्या महापे येथील एका आयटी कंपनीच्या 40 पैकी 19 कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर उर्वरित कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट अजून आलेले नाहीत. त्यामुळे नवी मुंबईकरांची चिंता वाढली आहे. या नव्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे नवी मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा आता 93 वर पोहोचला आहे (New Mumbai Corona update).

नवी मुंबईच्या महापे येथील एका डेटाबेस कंपनीतील 40 कर्मचाऱ्यांचे रुटीन चेकअप करण्यात आलं होतं. त्यामध्ये 19 कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या सर्वांचे रिपोर्ट खासगी लॅबमधील आहेत. 19 कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे माहित पडताच नवी मुंबई महापालिकेने तात्काळ त्यांना आयसोलेट करुन त्यांची ट्रॅव्हेल हिस्ट्री चेक केली. या सर्वांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले सर्व 19 कर्मचाऱ्यांचे स्वॅब सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत. हे सर्व कर्मचारी 20 मार्चपासून कंपनीत होते. ही एक डेटाबेस कंपनी आहे. कंपनी मोठी आहे आणि ती महापे एमआयडीसीमध्ये आहे.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 3451 30 151
पुणे (शहर+ग्रामीण) 665 19 53
पिंपरी चिंचवड 51 2
ठाणे (शहर+ग्रामीण) 172 5 6
नवी मुंबई 94 8 3
कल्याण डोंबिवली 93 2
उल्हासनगर 1
भिवंडी 6 2
मीरा भाईंदर 81 2
पालघर 18 1
वसई विरार 111 1 3
रायगड 16 0
पनवेल 34 3 1
नाशिक (शहर +ग्रामीण) 10
मालेगाव 85 8
अहमदनगर (शहर+ग्रामीण) 29 5 2
धुळे 4 1
जळगाव 3 1
नंदूरबार 4
सोलापूर 25 2
सातारा 13 2
कोल्हापूर 9 1
सांगली 27 4 0
सिंधुदुर्ग 1
रत्नागिरी 7 1
औरंगाबाद 35 5 3
जालना 1
हिंगोली 1
परभणी 1
लातूर 8
उस्मानाबाद 3 1
बीड 1
अकोला 16 1
अमरावती 6 1
यवतमाळ 16 4
बुलडाणा 21 1 1
वाशिम 1
नागपूर 79 5 1
गोंदिया 1
चंद्रपूर 2 1
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 15 2
एकूण 5218 722 251

संबंधित बातम्या :

अतिरिक्त निर्बंध, तरीही पुणेकर ऐकेनात, सर्व बंद असूनही चिकन दुकान उघडलं, नागरिकांच्या रांगा

महाराष्ट्रात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना अतिरिक्त धान्यसाठा उपलब्ध करा, भुजबळांचे आदेश

औरंगाबादमध्ये ‘कोरोना’बाधित महिलेच्या अंत्यविधीला शेकडोंची गर्दी!

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *