AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रवींद्र धंगेकर यांच्या ‘त्या’ व्हिडीओनंतर पुण्यातलं राजकारण का तापलंय?

काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओत ते महापालिका कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करताना दिसत आहेत. या व्हिडीओवरुन पुण्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे.

रवींद्र धंगेकर यांच्या 'त्या' व्हिडीओनंतर पुण्यातलं राजकारण का तापलंय?
| Updated on: Jan 30, 2024 | 9:05 PM
Share

पुणे | 30 जानेवारी 2024 : पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. मात्र आता महापालिकेच्याच अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी रवींद्र धगेकरांनी केलीय. या सर्व वादावरून पुण्यातलं राजकारण चांगलंच तापलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 26 जानेवारीला आशानगर येथे महापालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात येणार होते. या कार्यक्रमास काँग्रेस पक्षाला डावलल्याचा आरोप करुन काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केला होता. शासकीय कार्यक्रमाच्या अगोदरच टाकीचे उद्घाटन करण्यासाठी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते तेथे आले. त्यांनी टाकीपाशी जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडविल्यावर झालेल्या वादावादीत काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी महापालिका अधिकाऱ्याला अर्वाच्या भाषेत शिवीगाळ केली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर महापालिकेच्या अभियंता संघाने सोमवारी महापालिकेत सभा घेऊन या प्रकरणाचा निषेध केला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या जाहीर निषेध सभेलाच रवींद्र धंगेकारांनी काल आक्षेप घेतलाय. महापालिकेच्या आवारात कोणत्याही आंदोलनाला, सभेला परवानगी नसतानाही काल पालिकेच्या अधिकाऱ्यांनी निषेध सभा घेतली. त्यामुळे त्यांच्यावरच कारवाई करावी, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी आयुक्तांकडे केलीय.

रवींद्र धंगेकर नेमकं काय म्हणाले?

“माझ्या कडून जी शिवीगाळ झाली तो कार्यकर्त्यांऱ्यांचा संताप आणि भावना होत्या. मात्र पोलिसांचं जुना प्लॅन आहे. गुन्हा दाखल करून मला मुद्दाम जेलमध्ये घालण्याचा प्रयत्न करत आहेत. आयुक्तांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली आणि वेळ पडली तर त्यांची तक्रार मुख्यमंत्री मोहोदयांकडे करणार. ललित पाटील प्रकरणात मी सगळं समोर आणत असल्याने माझ्यावर पोलीस कारवाई करत आहेत”, अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकरांनी दिलीय.

याउलट धंगेकर यांच्या आरोपांना उत्तर देताना भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पोलिसांनी केलेली कारवाई कायदेशीर आणि योग्य असून रवींद्र धंगेकर यांची ही जुनी सवय असल्याचा आरोप केलाय. त्यामुळे आता या प्रकरणी काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.