पुणे: दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; सोन्याचे दर 47 हजारांच्या पार

पुण्यातील लक्ष्मी रोडवर असणाऱ्या सराफांच्या दुकानात आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ग्राहकांनी सोन्याची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. ग्राहकांची गर्दी वाढत असल्याने सोन्याच्या दरात काही अंशी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.

पुणे: दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; सोन्याचे दर 47 हजारांच्या पार
सोने

पुणे – दिवाळी हा भारतीय संस्कृतीमधला सर्वात मोठा सण मानला जातो, दिपोत्सवाच्या काळात ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. दिवाळीच्या काळामध्ये सोने खरेदीला विशेष महत्व असते. लक्ष्मी पूजन आणि दिवाळी पाडवा या दोन दिवशी आवर्जून सोने खरेदी केले जाते. पुण्यातील लक्ष्मी रोडवर असणाऱ्या सराफांच्या दुकानात आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ग्राहकांनी सोन्याची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. ग्राहकांची गर्दी वाढत असल्याने सोन्याच्या दरात काही अंशी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.

‘असे’ आहेत सोन्या-चांदीचे दर 

आज पुण्यात  24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा जवळपास 47 हजार 500 वर पोहोचला आहे. तर 23 कॅरेटचा दर 46 हजार 600 इतका आहे. 22 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना प्रति तोळ्यामागे 45 हजार 600 रुपये मोजावे लागत आहेत. 18 कॅरट सोन्याचा दर 38 हजार 100 इतका आहे. दुसरीकडे चांदीच्या भावात देखील वाढ झाली असून, चांदीचे दर प्रति किलो 64 हजारांवर पोहोचले आहेत.

बाजारात उत्साहाचे वातावरण 

गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. बाजारपेठ पूर्णपणे बंद होत्या. उद्योगधंदे देखील बंद होते. त्यामुळे अनेकांनी आपले रोजगार गमावले होते. हातात पैसा नसल्याने मागच्या दिवाळीत आर्थिक उलाढाल कमालीची मंदावली होती. मात्र आता हळूहळू देश कोरोनाच्या संकटातून बाहेर येत असून, लसीकरणाला देखील वेग आला आहे. कोरोना रुग्ण झपाट्याने कमी होत असल्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उद्योग-धंदे नव्या जोमाने सुरू झाले आहेत. विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होताना दिसत आहेत. या सर्वांचा सकारात्मक परिणाम हा बाजारपेठेवर झाल्याने खरेदीला वेग आला आहे. मागच्या दिवाळीला खरेदीची फारशी संधी न मिळाल्याने ग्राहक यंदा मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत.

 

संबंधित बातम्या 

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षात ‘PCMC ते फुगेवाडी’ मार्गावरून धावणार मेट्रो

राजकीय मतभेद विसरून वाडेश्वर कट्ट्यावर रंगला सर्वपक्षीय ‘दिवाळी फराळ’

आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या गोंधळाची पुणे पोलिसांकडून चौकशी होणार, सायबर विभागाकडे विद्यार्थ्यांची तक्रार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI