Pune rain : पुण्यातल्या कात्रज घाटात पुन्हा कोसळली दरड, 15 दिवसांतली तिसरी घटना; सुदैवानं जीवितहानी नाही

मागील 15 दिवसांत कात्रज घाटात दरड कोसळण्याची ही तिसरी घटना घडली आहे.या कात्रज घाट रस्त्याला राज्य विशेष महामार्गाचा दर्जा आहे. देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग यांच्याकडे आहे

Pune rain : पुण्यातल्या कात्रज घाटात पुन्हा कोसळली दरड, 15 दिवसांतली तिसरी घटना; सुदैवानं जीवितहानी नाही
दरड कोसळल्यानं कात्रज घाटात झाला वाहतुकीचा खोळंबाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 3:45 PM

पुणे : पुण्यातील कात्रज जुना बोगदा परिसरात दरड कोसळली आहे. मोठा दगड रस्त्यावर आला होता. त्यामुळे काहीकाळ कात्रज घाटात (Katraj Ghat) वाहतूक खोळंबली होती. याठिकाणी कोंडीही झाली होती. जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्यात आली आहे. मागील सात-आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे (Heavy rain) पावसाळ्याच्या दिवसात दरड पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे रस्यावर दगडे आणि झाडांच्या फांद्या आल्या होत्या. धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाचे आपत्ती निवारण पथक याठिकाणी दाखल झाले. त्यांच्यातर्फे रस्त्यांवरील दगडे आणि झाडाच्या फांद्या जेसीबीच्या (JCB) सहाय्याने हटविण्यात आल्या, अशी माहिती धनकवडी सहायक आयुक्त विजय वाघमोडे यांनी दिली. या घटनेसह तिसऱ्यांदा ही दरड कोसळली आहे. त्यामुळे हा रस्ता पुढील काही दिवसांसाठी धोकादायक बनला आहे.

मुसळधार पावसामुळे प्रकार वाढले

डोंगरावरून मोठमोठे चार ते पाच दगड खाली जोरात खाली आले होते. त्यापैकी दोन दगड तर रस्त्याच्या मधोमध पडले होते. सुदैवाने या घटनेत कोणताही अपघात, जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहतुकीचा काही काळासाठी खोळंबा झाला होता. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे. तर गेल्या सात ते आठ दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचत आहे, काही ठिकाणी झाडे कोसळत आहेत, तर काही ठिकाणी दरडी.. त्यामुळे घाट रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे.

हे सुद्धा वाचा

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

मागील 15 दिवसांत कात्रज घाटात दरड कोसळण्याची ही तिसरी घटना घडली आहे.या कात्रज घाट रस्त्याला राज्य विशेष महामार्गाचा दर्जा आहे. देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग यांच्याकडे आहे. मात्र, देखभाल दुरुस्तीसाठी निधी नसल्याचे कारण सांगून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळेच अशा घटना वारंवार घडताना दिसून येत आहे. यावर तातडीने उपाययोजना आखाव्या, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

कात्रज घाटात कोसळली दरड – व्हिडिओ

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.