AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dilip Mohite Patil : स्वत:च्या फायद्यासाठी समाजाला वेठीस धरू नका, मोहिते पाटलांचा राजगुरूनगरात आवठलेंवर हल्लाबोल

रामदास आठवले स्वत:च्या फायद्यासाठी संपूर्ण समाजाला वेठीस धरू नका. समाजाचा बळी देऊ नका. यातून समाजाचा फायदा होणार नाही. झाला तर फक्त रामदास आठवलेंचाच फायदा होईल, असे वक्तव्य आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांनी केले.

Dilip Mohite Patil : स्वत:च्या फायद्यासाठी समाजाला वेठीस धरू नका, मोहिते पाटलांचा राजगुरूनगरात आवठलेंवर हल्लाबोल
रामदास आठवलेंवर टीका करताना दिलीप मोहिते पाटीलImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 14, 2022 | 4:01 PM
Share

खेड, पुणे : केंद्र सरकारमध्ये (Central Government) केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांचा पाठिंबा आहे. मात्र केंद्राचा सध्याचा कारभार पाहता कधीही बाबासाहेबांची घटना बदलली जाईल. त्यामुळे रामदास आठवले स्वत:च्या फायद्यासाठी संपूर्ण समाजाला वेठीस धरू नका. समाजाचा बळी देऊ नका. यातून समाजाचा फायदा होणार नाही. झाला तर फक्त रामदास आठवलेंचाच फायदा होईल, असे वक्तव्य आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांनी केले. राजगुरूनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. रामदास आठवले यांनी भाजपाशी जवळीक साधल्याच्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. घटना बदलण्यासही ते मागेपुढे पाहणार नाहीत, असा घणाघात त्यांनी यावेळी केला.

‘भाजपाच्या लोकांना एक आणि बाकीच्यांना दुसरा न्याय’

पुढे ते म्हणाले, की केंद्र सरकारकडून भाजपाच्या लोकांना एक न्याय आणि राज्यातील नेत्यांना वेगळा आहे. इतरांना वेगळ्या प्रकारची वागणूक दिली जाते. मागील काही काळापासून असा प्रकारत राज्यात सुरू आहे. त्यामुळे आता बाबासाहेबांनी तयार केलेली घटनासुद्धा बदलायला किंवा दुरुस्त करायला ते मागेपुढे पाहाणार नाहीत, अशा भिती आमदार मोहिते पाटलांनी व्यक्त केली.

‘समाजाला काय उपयोग झाला?’

मागच्या पाच वर्षात तुम्ही केंद्रात राज्यमंत्री झालात, त्याव्यतिरिक्त काय साध्य झाले, असा सवाल त्यांनी केला. केवळ स्वत:चा फायदा करून घेतला. समाजाला काय उपयोग झाला, असे मोहिते पाटलांनी यावेळी विचारले.

आणखी वाचा :

Pune : इंधन दरवाढीचा सर्वांनाच फटका; शाळेची फी, वाहतूक अन् खाद्यपदार्थांसाठी खिसा करावा लागतोय रिकामा

Pune Edible Oil : सावधान, खाद्यतेलाचा पुन्हा पुन्हा वापर कराल तर! अन्न आणि औषध प्रशासनाचा पुणेकरांना इशारा

Pune crime : मावशीसह करत होता घरफोड्या, गुन्हे शाखेच्या पथकानं ठोकल्या बेड्या; लोणी काळभोरमधला प्रकार

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.